माणिकराव खुळे
गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारा पडल्या.
त्यामुळे बरंच शेतीचं नुकसान झाले आहे. आता या गारपीटीची शक्यता कमी असल्याचा अंदाज आहे.
- मंगळवार दि.२८ नोव्हेंबर-
पाऊस -संपूर्ण महाराष्ट्रात केवळ विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
गारपीट – महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता नाही. - बुधवार दि.२९, गुरुवार दि. ३० नोव्हेंबर, व शुक्रवार दि.१ डिसेंबर
पाऊस – संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता
गारपीट – शक्यता नाही. - शनिवार दि.२ डिसेंबर पासून-
(i)प्रणाली विरळ होवून वातावरण निवळण्याची जाणवते. व त्याच दरम्यान
(ii)बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता असुन ते बांगलादेश ब्रम्हदेश कडे मार्गस्थ होण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रावर त्याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही. - बुधवार दि.२९ नोव्हेंबरपासून मात्र हळूहळू थंडीच्या सुरवातीची शक्यताही जाणवते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.