मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑस्ट्रेलियन ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट कमिशनने प्रोवाईन मुंबईमध्ये यंदाच्या वर्षी २४ प्रतिष्ठित ऑस्ट्रेलियन वाईनरीजना पाठवले होते. भारतात आलेले ऑस्ट्रेलियन वाईन्सचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे शिष्टमंडळ होते. दक्षिण ऑस्ट्रेलिया, व्हिक्टोरिया, न्यू साउथ वेल्स आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या राज्य सरकारांसोबत भागीदारीत वाईन ऑस्ट्रेलियाच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
ट्रेड व इन्व्हेस्टमेंट कमिशनर (ऍग्रीफूड) जॉन साऊथवेल यांनी सांगितले, “यंदाच्या वर्षी प्रोवाईन मुंबईमध्ये अनेक वेगवेगळ्या ऑस्ट्रेलियन वाईन्स सादर करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. हा उपक्रम ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील भागीदारीमध्ये होत असलेली भरभराट दर्शवत असून, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवत आहे. भारतामध्ये वाईन फूड आणि वाईन सीनमध्ये होत असलेल्या सातत्यपूर्ण विकासाला व त्यांच्याशी पूरक व्यवसायांना समर्थन देण्यासाठी, भारतीय पॅलेटसाठी फिट असलेल्या ऑस्ट्रेलियन वाईन्सचे नावीन्य आणि उत्कृष्टता दर्शवणारा इमर्सिव्ह अनुभव आम्ही प्रदान करत आहोत.”
धाडसी नावीन्य, अद्वितीय वातावरण आणि द्राक्षांच्या १०० पेक्षा जास्त दर्जेदार प्रकारांसाठी नावाजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन वाईन्स पेय क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहेत. परंपरांच्या मर्यादा झुगारून देऊन अनोखा अनुभव मिळवून देत आहेत. भारतात ऑस्ट्रेलियन वाईन्स सादर करण्याची ही सर्वोत्तम वेळ ठरली. ऑस्ट्रेलिया-भारत आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार २९ डिसेंबर २०२२ रोजी अंमलात आला आणि आधीच ऑस्ट्रेलियन वाईनवरील १५०% टॅरिफ ५ यूएस डॉलर्स प्रति बाटली लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, पुढील आठ वर्षात यामध्ये आणखी कपात केली जाईल. सुमारे एका महिन्याभरात, प्रीमियम ऑस्ट्रेलियन वाईन्सच्या दरात टप्प्याटप्प्याने कपात केली जाईल, त्यामुळे ऑस्ट्रेलियन वाईन्स हा भारतीय वाईन आयातदारांसाठी एक उत्तम प्रस्ताव आहे.
भारतीय आणि ऑस्ट्रेलियन व्यवसायांमध्ये व्यावसायिक संधींबद्दल जागरूकता वाढवणे आणि ऑस्ट्रेलियन व्यवसायांना बाजारपेठेत प्रवेश आणि विस्तारासह व्यावहारिक समर्थन प्रदान करणे हा ऑस्ट्रेलिया-इंडिया बिझनेस एक्सचेंज प्रोग्रामचा उद्देश आहे. ऑस्ट्रेलिया-इंडिया बिझनेस एक्सचेंज प्रोग्रामची टॅगलाइन ‘समृद्धीसाठी भागीदारी’आहे. ऑस्ट्रेडने आपल्या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये वाढ घडवून आणणाऱ्या द्वि-मार्गी भागीदारीचे महत्त्व प्रतिबिंबित करण्यासाठी जाणीवपूर्वक ती निवडली आहे.
प्रोवाईनमध्ये उत्तम भागीदारी घडून आल्या आहेत, यामध्ये दोन व्हिक्टोरियन वाईनरीज जिल्झी वाईन्स आणि रॅथबोन वाईन ग्रुपने आपल्या शानदार वाईन्स भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय वितरकांसोबत केलेल्या भागीदारीचा समावेश आहे.