नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. त्यांनी १४० कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्य, कल्याण आणि समृद्धीसाठी भगवान व्यंकटेश्वर स्वामींचे आशीर्वादही मागितले आहेत. मोदींनी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातील क्षणचित्रे सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टवर म्हटले आहे; “तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात, १४० कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्य, कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.”