नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई- आग्रा महामार्गावर कारचा अपघात झाला असून एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहे. रविवारी रात्री सव्वा दोन वाजता नाशिककडून मुंबईकडे जाणारी कार व्हीटीसी फाट्याजवळ नाल्यात जाऊन पडली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
या करामध्ये तीन जण होते. त्यापैकी एकाच्या डोक्याला गंभीर मार लागला. तर दोन जण किरकोळ जखमी झाले. भगवान घुगे (४०) रवी मगन लहांगे (३०) अक्षय शाम बरड (२३) रा मोरवाडी नाशिक ही जखमी झालेल्यांची नावे आहे.
अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिता लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींना नाशिक येथील लाईफ केअर हॅास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.