इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने टी -२० सामन्यातील पाच दिवसाच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा दुसरा पराभव करत सामना खिशात घातला. भारताने ४ गडी गमावत २३५ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला दिले होते. पण, ऑस्ट्रेलियाचा संघाने ९ गडी गमावत १९१ धावा केल्या. भारताने ४४ धावांनी ही विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने सलग दुसरा विजय मिळवल्यामुळे आता तिसरा सामना भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जिंकल्यास ही मालिका भारताचा विजय निश्चित होणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या स्टॉयनिस याने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तर टीम इंडियाकडून रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. भारताकडून यशस्वी जयस्वाल ५३ धावा, ऋतुराज गायकवाड ५८ धावा , इशान किशन ५२ धावा केल्या तर रिंकू सिंह याने अवघ्या ९ बॉलमध्ये ३१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस याने ३ विकेट घेतल्या होत्या.
फलंदाजी करतांना ऑस्ट्रेलिया संघाने दमदार सुरूवात केली होती. पण, भारतीय गोलंदाजांना सलग तीन मोठे झटके दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली. त्यानंतर हा सामना त्यांना अवघड वाटेवर घेऊन गेला. कर्णधार मॅथ्यू वेड हा शेवटपर्यंत ४२ धावांवर नाबाद राहिला. त्याला दुसऱ्या बाजूने त्याला कोणाची साथ मिळाली नाही.