नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या काटिबद्धतेसह, केंद्र सरकार सक्रियपणे, उत्तरकाशी मधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांच्या बचावाचे अभियान वेगाने राबवत आहे. या बोगद्यातील २ किमी कॉक्रीटचे काम पूर्ण झाले असून कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट आहे.
विविध सरकारी यंत्रणा त्यांना दिलेल्या विशिष्ट कार्यात अथकपणे गुंतल्या असून, कामगारांच्या सुरक्षित सुटकेसाठी काम करत आहेत. या ठिकाणी बचाव कार्याबाबत सूचना करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ उपस्थित आहेत. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी, सरकार सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे.
बचाव कार्यातील महत्वाची अद्ययावत माहिती :
- एनचआयडीसीएल लाईफलाईन चे प्रयत्न :: ताजे शिजवलेले अन्न आणि ताजी फळे नियमित अंतराने दुसऱ्या लाईफ लाइन (150 मिमी व्यास) सेवेचा वापर करून बोगद्याच्या आत पोहोचवली जात आहेत. संत्री, सफरचंद, केळी सारख्या पुरेशा फळांसह औषधे आणि क्षारांचाही या पाईपमधून नियमित अंतराने पुरवठा करण्यात येत आहे. भविष्यातील साठ्यासाठी अतिरिक्त सुक्या खाद्यपदार्थांचाही पुरवठा केला जात आहे.
एसडीआरएफ ने विकसित केलेली सुधारित संपर्क व्यवस्था स्थापन करून, अडकेल्या मंजुरांशी नियमित संपर्क ठेवला जात आहे. अडकलेले सर्व कामगार सुरक्षित आहेत.
3.सतलज जल विद्युत निगम-SJVNL द्वारे बचावासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग:
ड्रिलिंग मशिनरी घटनास्थळी दाखल झाल्या.ड्रिलिंग मशिन सुरू करण्यासाठी प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले आहे. बोगद्यावरील ड्रिलिंग पॉईंटचे मार्किंग Ch 300 L/S. या ठिकाणी जीएसआय , आरव्हीएनएल आणि ओएनजीसी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम रूप देण्यात आले आहे.
मशीनची जोडणी सुरू झाली आहे. मुख्य मशीन ड्रिलिंग साइटवर पोहोचले आहे.बोगद्याच्या पोर्टलवरून ड्रिलिंग साइटपर्यंत मशीनची ड्रिलिंग रिग पाठवली आहे. 26.11.2023 रोजी दुपारी 12 .05 वाजता ड्रिलिंग सुरू झाले.
4.टिहरी हाइड्रो विकास निगम लिमिटेड (टीएचडीसीएल) द्वारे बरकोटच्या बाजूला हॉरीझॉन्टल ड्रिलिंग:
टीएचडीसीएलने बरकोटच्या टोकापासून बचाव बोगद्याचे बांधकाम सुरू केले आहे, पाचवा स्फोट 26.11.2023 रोजी दुपारी 2. 25 वाजता करण्यात आला.ड्रिफ्टची एकूण लांबी 10.6 m आहे. 13 क्रमांकाच्या रिब्सचे फॅब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे.
5.आरव्हीएनएल द्वारे हॉरीझॉन्टल ड्रिलिंग
कामगारांना वाचवण्यासाठी हॉरीझॉन्टल ड्रिलिंग करण्यासाठी लागणारी सूक्ष्म बोगद्याची उपकरणे नाशिक आणि दिल्लीहून घटनास्थळी पोहोचली आहेत. प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
6.सिल्क्याराच्या बाजूने आरव्हीएनएल द्वारे व्हर्टिकल ड्रिलिंग (8 इंच व्यास)
बीआरओ ने 1150 मीटरचा प्रवेश रस्ता पूर्ण केला आहे आणिआरव्हीएनएलला सुपूर्द केला आहे. बीआरओ ने ड्रिलिंगसाठी उपकरणे कामाच्या ठिकाणी आणली आहेत.
26.11.2023 रोजी पहाटे 4. 00 वाजता ड्रिलिंग सुरू झाले आणि 40 मीटर पूर्ण झाले.
7.ओएनजीसी द्वारे बरकोटच्या दिशेने व्हर्टिकल ड्रिलिंग (24 इंच व्यास )
ओएनजीसी च्या खोदकाम पथकाने 20.11.2023 रोजी साइटला भेट दिली. इंदूर येथून एअर ड्रिलिंग रिग मशीन घटनास्थळी पोहोचले आहे.
8.THDCL/लष्कर/कोल इंडिया आणि NHIDCL च्या संयुक्त टीमकडून मॅन्युअल-सेमी मेकॅनाइज्ड पद्धतीने ड्रिफ्ट टनेलचे खोदकाम
ड्रिफ्ट डिझाइन पूर्ण झाले आहे (1.2 मी X 1.5 मी विभाग)
साहित्य घटना स्थळी पोहोचले. 21.11.2023 रोजी लष्कराच्या वेल्डर्सनी फॅब्रिकेशन सुरू केले. 22 फ्रेम्स तयार करण्यात आल्या आहेत. - बीआरओ द्वारे रोड कटिंग आणि सहाय्यक काम:
बीआरओ ने SJVNL आणि RVNL द्वारे व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी अप्रोच रोडचे बांधकाम पूर्ण केले आहे.
ओएनजीसी द्वारे करण्यात आलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या आधारावर बीआरओ,ओएनजीसी साठी अप्रोच रोड देखील बनवत आहे. 5000 मीटरपैकी 1050 मीटरचा अप्रोच रोड तयार करण्यात आला आहे.
पार्श्वभूमी:
12 नोव्हेंबर 2023 रोजी, सिल्क्यरा ते बरकोट दरम्यान बांधल्या जाणाऱ्या बोगद्यात सिल्क्यराच्या बाजूला 60 मीटर भागात बोगद्याचा भाग कोसळला होता. त्यानंतर बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुटका करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने साधन सामुग्रीची जमवाजमव सुरु केली.
टीप: तांत्रिक त्रुटी, हिमालयातील खडतर भौगोलिक स्थिती आणि अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीमुळे बचाव कार्य लांबू शकते.