इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक – हौशी रोप स्किपींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आणि क्रीडा भारती,नाशिक यांच्या सहकार्याने नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे अयोजीत २४ व्या राष्ट्रीय रोप स्किपिग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला मीनाताई ठाकरे स्टेडियम, विभागीय क्रीडा संकुल , हिरावाडी, पंचवटी, नाशिक येथे मोठ्या उत्साहात सुरवात झाली. स्पर्धेत संपूर्ण भारतातील २० राज्यांचे एकूण ८०० खेळाडू सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांचे हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून रोप स्किपींग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष शैलेश शुक्ला, सचिव निर्देश शर्मा, भा. ज. प. चे सरचिटणीस सुनिल केदार, काशिनाथ शिलेदार, रोहिणी नायडू- वानखेडे, नाशिक जिल्हा रोप स्किपींग असोसिएशनचे अध्यक्ष शाम बडोदे, मा. नगरसेवक तथा व्ही. एन नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस तानाजी जायभावे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी सर्व राज्यांच्या खेळाडूंनी शानदार संचलन केले. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोप स्किपींग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव निर्देश शर्मा यांनी केले.
यावेळी त्यांनी रोप स्कीपिंग या खेळाचे असलेले महत्व, हा खेळ भगवान श्रीकृष्ण देखील खेळत होते, तसेच शारीरिक व्यायामासाठी रोप स्किपींग कसा उपयुक्त आहे , सर्व खेळांसाठी पूरक खेळ म्हणून देखील उपयुक्त आहे अशी माहिती दिली. स्पर्धेत महाराष्ट्र संघात समाविष्ट असणारे व लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेले सेंट फ्रान्सीस शाळेचे विद्यार्थी सार्थक तारकुंडे ( २९९९ उडी १० मिनिटे) व सात्विक निरगुडे (८०५ उडी ०५ मिनिटे), (२४० उडी ०१ मिनिटे) यांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत ११ वर्षे . १४ वर्षे, १७ वर्षे , १९ वर्षे या गटांचा समावेश आहे. या रोप जम्प खेळांमध्ये ३० सेकंद स्पीड, ३० सेकंद वन लेग स्वीच, ३ मिनिट इंडूरन्स, फ्री स्टाईल, स्पीड रिले, डबल डच स्पीड रिले, डबल डच फ्री स्टाईल, सिंगल रोप पेअर फ्री स्टाईल,अश्या आठ प्रकारांचा समावेश आहे. आज खेळल्या गेलेल्या विविध प्रकारामध्ये विजेत्या खेळाडूंना केंद्रीय आरोग्य मंत्री भरती पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल्स आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
स्पर्धेचे आयोजन हौशी रोप स्किपींग असोसिएशन महाराष्ट्रचे सरचिटणीस संजय पाटील, क्रीडा भारती नाशिकचे अध्यक्ष विनोद शिरभाते, विजय बनसोडे, राकेश पाटील, स्वप्नील करपे, सुरेखा पाटील, शैलजा जैन यांचे मार्गदर्शनाखाली जयश्री भुसारे, क्षितिजा खटावकर, प्रज्ञा पात्रीकर, कामिनी केवट, चारुलता सूर्यवंशी, मंजिरी पाटे, रश्मी पराते, साक्षी खोडे, अनुष्का पगारे , अक्षदा शिंदे, गीता चित्ते, पृथ्वी लोखंडे, चंद्रकांत भाग्यवंत, शार्दुल सर, हिरामण शिंदे, जे. पी. पवार, शंकर आहिरे, अमोल पवार, अमोल जाधव, बाळासाहेब रणशूर, सुनिल दवंगे, पवन खोडे ,अभिजित देशमुख, युवराज शेलार, विनोद वाणी, गणेश ढेमसे, मोहम्मद कैफ, भावेश नांद्रे, रोहित भामरे, तेजस मोरे, आनंद ठाकूर, साहिल जाधव, रोहित जगताप, हितेश सोनावणे, ऋषिकेश डावरे, हर्षित परदेशी, नचिकेत सैंदाणे, आशिष पाटे, कल्पेश शिंदे, विवेक सोनावणे, वजाहद अली आदी प्रयत्नशील आहेत.