माणिकराव खुळे
१-महाराष्ट्राला संपूर्ण हिवाळ्यात फक्त थंडी देणाऱ्या, उत्तर वायव्य भारतातील ‘ पश्चिमी झंजावात ‘, सध्या गुजराथ महाराष्ट्रावरून, दक्षिणेकडे पार अरबी समुद्रपर्यंत सरकल्यामुळे, त्याच्या सहा किमी. पेक्षा अधिक उंचीवर तयार होणाऱ्या हवेच्या दाबाच्या ‘ आसा ‘ मुळे, वर उंचावरून खाली जमिनीकडे झेपवणाऱ्या थंड व कोरडे वाऱ्यांचा, व तसेच दक्षिण भारतातून हवेच्या दाबाचा तयार झालेला निम्न पातळीतील ‘ पुरवी झोत आसा ‘ तुन जमिनीकडून वरच्या दिशेने (खालून वर) वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्याच्या मिलाफातून, अश्या दोन प्रणल्यांच्या एकत्रित परिणामातून, नोव्हेंबरच्या ह्या शेवटच्या आठवड्यात, सध्या हंगामातील पहिल्या थंडी ऐवजी, आपणास अनपेक्षितपणे अवकाळी पावसाची सलामी मिळत आहे. लगेचच बुधवार २९ नोव्हेंबरपासून मात्र हळूहळू थंडीची सुरवातीची शक्यताही जाणवते. काल व आज उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. उद्या सुध्दा त्याची तीव्रता कायम आहे.
२- नेमक्या नोव्हेंबरच्या ह्याच शेवटच्या आठवड्यात सध्या भारतीय विषववृत्तीय सागरीय परिक्षेत्रात प्रवेशलेला ‘ मॅडन ज्युलीयन ऑसिलेशन ‘ एकपेक्षा अधिक ऍम्प्लिटुडच्या घेराने कार्यरत असल्यामुळे दक्षिण थायलंड व अंदमान व निकोबारच्या दक्षिणेकडे बंगालच्या उपसागरात ३ ते ६ किमी दरम्यान चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे उद्या सोमवार २७ नोव्हेंबर रोजी कमी दाब क्षेत्र तयार होवून चक्रीवादळाची बीजे रोवण्याची शक्यता आहे. त्याची समुद्रात वायव्यकडे मार्गस्थ होण्याची शक्यता जाणवते. त्याच्या दिशा व विकासनावरच पुढील वातावरणीय परिणाम जाणवेल.
३- गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी पुन्हा एक सौम्य पश्चिमी झंजावात पश्चिम हिमालयीन क्षेत्रात आपला परिणाम दाखवण्याची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.