इंडिया दर्पण वृत्तसेवा
नवी दिल्ली – भारतात क्षय (टीबी) प्रतिरोधक औषधांचा तुटवडा असल्याचा दावा करणाऱ्या काही बातम्या प्रसार माध्यमांमध्ये प्रसृत होत आहेत. या बातम्या खोट्या, दिशाभूल करणाऱ्या, हेतूपुरस्सर असतात आणि जाणूनबुजून लोकांना फसवण्याच्या आणि बुद्धीभ्रम करण्याच्या हेतूने पसरवलेल्या असल्याचा खुलासा केंद्र सरकारने केला आहे.
औषधाला त्वरीत प्रतिसाद देणाऱ्या क्षयरोगावरील उपचारात, 4FDC (आयसोनियाझिड, रिफॅमपिसीन, इथांब्युटोल आणि पायराझिनामाइड) या दोन महिने घेण्याच्या चार औषधांचा समावेश आहे आणि त्यानंतर दोन महिने घेण्यासाठी, 3 FDC (आयसोनियाझिड, रिफॅमपिसीन आणि इथांब्युटोल) या तीन औषधांचा समावेश आहे.
ही सर्व औषधे सहा महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी पुरेशा साठ्यासह उपलब्ध आहेत. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी या औषधांची खरेदी प्रक्रिया देखील आधीच सुरू करण्यात आली आहे. मल्टी ड्रग रेझिस्टंट (एमडीआर) अर्थात बहुऔषधे प्रतिरोधक क्षयाच्या उपचार पद्धतीमध्ये साधारणपणे ४ महिने ७ औषधे (बेडाक्विलिन, लेव्होफ्लॉक्सासिन, क्लोफॅझिमिन, आयसोनियाझिड, इथांब्युटोल, पायराझिनामाइड आणि इथिओनामाइड) आणि त्यानंतर पाच महिन्यांची ४ औषधे (लेव्होफ्लॉक्सासिन, क्लोफॅझिमाइन, क्लोफॅझिमाइन, क्लोफॅझिमिन आणि इथिओनामाइड) यांचा समावेश होतो. औषध प्रतिरोधक क्षय असलेल्या सुमारे ३० % व्यक्तींमध्ये सायक्लोसरीन आणि लाइनझोलिड आवश्यक आहे. बहुऔषध प्रतिरोधक क्षयावरील औषधे घेत असलेले रुग्ण एकूण क्षयरोगग्रस्ताच्या केवळ २.५ % आहेत. तथापि, या रुग्णांसाठी देखील औषधांची अजिबात कमतरता नाही, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
राष्ट्रीय क्षय निर्मूलन कार्यक्रम (नॅशनल टीबी एलिमिनेशन प्रोग्राम-NTEP) अंतर्गत केंद्रीय स्तरावर क्षयरोधक औषधे आणि इतर साहित्य यांची, खरेदी-साठवण-साठ्यांची देखभाल आणि वेळेत वितरण, केले जात आहे. दुर्मिळ परिस्थितीत, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विशेष आर्थिक तरतुदींच्या सुविधेचा (बजेट) उपयोग करून मर्यादित कालावधीसाठी स्थानिक पातळीवर काही औषधे खरेदी करण्याची राज्यांना विनंती केली जाते, जेणेकरून रुग्णांच्या वैयक्तिक देखभालीवर परिणाम होणार नाही.
अशा प्रकारे, NTEP अंतर्गत मॉक्सिफ्लॉक्सासिन ४०० मिलीग्रॅम आणि पायरीडॉक्सिन चे १५ महिन्यांहून अधिकचे साठे उपलब्ध आहेत. तसेच, ऑगस्ट २०२३ मध्ये डेलामॅनिड ५० मिलीग्रॅम आणि क्लोफाझिमाइन 100 मिलीग्रॅम, या औषधांचे साठे खरेदी करण्यात आले आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवले गेले. या व्यतिरिक्त, 23.09.2023 रोजी अतिरिक्त ८ लाख एवढ्या डेलामॅनिड ५० मिलीग्राम गोळ्यांच्या पुरवठ्यासाठी खरेदी मागणी पत्र (पर्चेस ऑर्डर P.O) जारी करण्यात आले आहे.
वर नमूद केलेल्या साठ्यांव्यतिरिक्त, ऑगस्ट २०२३ मध्ये ३ निश्चित मात्रा संयोजन (FDC(P), लाइनझोलिड-600 मिग्रॅ आणि कॅप्सूल सायक्लोसरीन-250 मिग्रॅ च्या पुरवठ्यासाठी खरेदी आदेश जारी करण्यात आले होते. 3 निश्चित मात्रा संयोजन (FDC(P), लाइनझोलिड-600 मिग्रॅ आणि कॅप्सूल सायक्लोसरीन-250 मिग्रॅ साठी पाठवणी पूर्व तपासणी (PDI) अहवाल तसेच 3 निश्चित मात्रा संयोजन (FDC(P) आणि सायक्लोसरीनचे गुणवत्ता चाचणी अहवाल आले आहेत. ही औषधे राज्यांना पाठवली जात आहेत.