शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हिंगोलीत ओबीसी समाजाच्या एल्गार परिषदेत भुजबळांनी केली ही प्रमुख मागणी.. सरकारच्या अडचणी वाढणार

नोव्हेंबर 26, 2023 | 4:15 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20231126 WA0288

इंडिाया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही, तर जाळ पोळ करणाऱ्या झुंड शाहीला आमचा विरोध आहे असे मत व्यक्त करत शिंदे समिती बरखास्त करून, दिलेले खोटे कुणबी प्रमाणपत्र तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी  केली.

ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचावासाठी तसेच या बांधवांच्या न्याय हक्कासाठी आज हिंगोली येथील रामलीला मैदानावर राज्यातील ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा’ पार पाडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.

यावेळी ओबीसी जनमोर्चाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री आ.महादेव जानकर खासदार रामदास तडस,ओबीसी महासंघाचे डॉ.बबनराव तायवाडे,भटक्या विमुक्तांचे नेते प्रा.लक्ष्मण गायकवाड, आमदार राजेश राठोड, आमदार डॉ.प्रज्ञा सातव, मुस्लिम ओबीसी संघाचे शब्बीर अन्सारी,प्रा.टी.पी.मुंडे, माजी खासदार समीर भुजबळ, डॉ.बी.डी.चव्हाण, माजी आमदार रामराव वडकुते, प्रकाश राठोड, ॲड.सचिन नाईक, यांच्यासह सकल ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्याक समाज व हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी व ओबीसी बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जीवाची पर्वा न करता अनेक आंदोलने केली आहे आणि यापुढेही आंदोलने करण्याबाबत आपल्याला चिंता नाही. तुम्ही १७ सभा घेतल्या तेव्हा आम्ही केवळ एकच सभा घेतली. आमचं दुःख मांडताना आम्ही कुठलीही जाळपोळ केली नाही दगडफेक केली नाही. मात्र तुम्ही अनेकांची घर जाळली दगडफेक केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही, तर जाळ पोळ करणाऱ्या झुंड शाहीला आमचा विरोध आहे

IMG 20231126 WA0283

असे सांगत पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते अशी टीका त्यांनी यावेळी केली.ते म्हणाले की, ज्या शिव्या कोणी वाचू शकत नाहीत, अशा शिव्या गेले दोन महिने मी आणि माझे कुटुंब सातत्याने ऐकत आलोय. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपल्याला त्याची पर्वा नाही आपण लढत राहू. आपल्याला जर आपले हक्क अबाधित ठेवायचे असतील तर…. अधिकार की लडाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं, हमारे हक पर जहां आँच आए टकराना जरूरी है, और तुम जिंदा हो, तो जिंदा नजर भी आना जरूरी है या शायारीतील पंक्तीतून उपस्थित ओबीसी बांधवांना आवाहन केले.यावेळी उपस्थित ओबीसी बांधवांसमोर ते पुढे म्हणाले की, आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने एकत्र यायला हवं. त्यासाठी कुणाचीही वाट न पाहता एकत्र येऊन गावागावात बैठका घ्या, सभा घ्या आणि एकत्र येऊन ओबीसींचा आवाज बुलंद करा असे आवाहन त्यांनी उपस्थित बांधवांना केले.

ते म्हणाले की, मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही मात्र राज्यात मराठा कुणबीच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने दाखले वाटले जाताय ते सर्व दाखले तातडीने रद्द करा. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जी शिंदे समिती नेमण्यात आली आहे ही समिती देखील बरखास्त करून मराठा समाजाच मागासलपण शोधण्याची गरज आहे. त्यासाठी निरगुडे आयोगाने केवळ मराठ्यांचे सर्वेक्षण न करता महाराष्ट्रातील सर्व जातींचे सर्वेक्षण करून त्यांचं मागासलेपण शोधण्याची गरज आहे. तेव्हाच सर्वांना न्याय मिळेल. त्यामुळे मराठा समाजाच एकट्याच सर्वेक्षण नको, सर्व समाजाचे सर्वेक्षण करा असे आवाहन त्यांनी केलं.

ते म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने सर्वांना देशात सर्वत्र फिरण्याचा अधिकार दिला आहे. बोलण्याचा अधिकार आणि स्वातंत्र दिले आहे. यामुळे कोणाला गावबंदी करता येऊ शकत नाही. गावबंदी केली तर एका महिन्याची शिक्षा करण्याची तरतूद आहे. ज्यांनी गावबंदीचे बोर्ड लावले त्यांना एका महिन्याच्या शिक्षा करा. आता सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करणार आहे की नाही? पोलीस हे करणार आहे की नाही? राज्यात सर्वत्र लावलेले गावबंदीचे बोर्ड काढा. पोलिसांनी राज्यघटनेप्रमाणे कारवाई करावी, असा हल्लाबोल ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ आपल्याच सरकारवर केला. तसेच राजेश टोपे, रोहित पवार यांचे तुम्ही स्वागत करतात. त्यांच्यासाठी गावबंदी नाही, परंतु आमच्या नेत्यांना गावबंदी केली जात आहे, अशी खरमरीत टीका  केली.

ते म्हणाले की, राहुल गांधी देशात जातीय जनगणनेची मागणी करत आहे. इतर पक्षातूनही ही मागणी पुढे येत आहे. मग एकादाची जातीय जनगणना करा आणि ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊन जाऊ द्या. मग समजणार कोण मागास आहे. बिहार करु शकतो तर महाराष्ट्र का करु शकत नाही. जनगणनेत जे येईल, ते मान्य करायला आम्ही तयार आहोत, असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.या सभेच्या पूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व उपस्थित ओबीसी बांधवांनी सव्वीस अकरा हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना आदरांजली अर्पण केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला करायची आहे या आध्यात्मिक गुरूची भूमिका….हे आहे कारण

Next Post

मनमाडला गारांचा पाऊस… नाशिक, सिन्नर नंतर अवकाळी पावसाची शहरात हजेरी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
Screenshot 20231126 162751 WhatsApp

मनमाडला गारांचा पाऊस… नाशिक, सिन्नर नंतर अवकाळी पावसाची शहरात हजेरी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011