इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मध्य प्रदेशमध्ये एका महिलेने घरासमोर काढलेल्या रांगोळीवरुन गाडी गेली म्हणून त्या वाहनांच्या रॅाडने काचा फोडल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
खरं तर रांगोळी काढल्यानंतर त्यावर कोणाचा पाय पडतो. तर काही जण वाहनही नेतात. त्यात ब-याच वेळा रस्त्यावर काढलेल्या रांगोळीबाबत हे घडत असते. त्यातून महिलांचा संताप होतो. पण, त्यातून ते कधी भांडण करत नाही. ते त्यांनाही अपेक्षित असते. काही जण मात्र रांगोळी मुद्दाम खराब करतात. त्यावेळेस त्यातून भांडणही होते.
मध्य प्रदेशमध्ये रांगोळीवरुन वाहन नेण्याचा प्रकार हा मुद्दामहून खोडसाळपणा असावा. त्यामागे मागील भांडणाची काही कारणे असावीत असेही बोलले जात आहे. एक्सवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओत ये अंधा था क्या… अंटी मेरी बात सुनो…पिछे की काच फोडो असे वाक्य एेकायला मिळतात..