इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजप नेते निलेश राणे यांनी एक्सवर फोटो शेअर करत अंतरवली सराटीतील दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? असा प्रश्न केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात या फोटीची व पोस्टची चर्चा रंगली आहे.
या पोस्टमध्ये राणे यांनी म्हटले आहे की, अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय? असे म्हटले आहे. या पोस्टबरोबरच त्यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.