इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढत टी -२० मालिकेतील पहिल्याच रोमांचकारी सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर आज तिरुवनंतपुरम येथे दुसरा सामना रंगणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
विशाखापट्टणम य़ेथे झालेल्या सामन्यात विजयासाठी एक धावा व अवघा एक बॅाल शिल्लक असतांना रिंकू सिंह याने सिक्स मारत हा विजय मिळवून दिला होता. भारताने या सामन्यात १९.५ ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावत हा सामना जिंकला होता. आजच्या सामन्यात कोण नाणेफेक जिंकतो व त्यानंतर किती धावा केल्या जातात हे महत्त्वाचे असणार आहे.
विशाखापट्टणम य़ेथील सामन्यात सूर्यकुमार यादवने ८० तर ईशान किशन याने ५८ धाव केल्या. रिंकू सिंह याने नाबाद २२ धावा केल्या. यशस्वी जयस्वाल २१ तर तिलक वर्मा १२ धावा केल्या. अक्षर पटेल २ रन्स करुन आऊट झाला. तर ऋतुराज गायकवाड, रवि बिश्नोई आणि अर्शदीप सिंह व मुकेश कुमार या तिघांना भोपळाही फोडता आला नाही.
T20I मालिकेसाठी भारतीय संघामध्ये सर्व तरुण खेळा़डू आहे. त्यात सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार असा असणार आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर रायपूर आणि बेंगळुरू येथे झालेल्या शेवटच्या दोन T20 सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून संघात सामील होईल.
असा आहे ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
पहिला T20I – २३ नोव्हेंबर – विशाखापट्टणम
दुसरा T20I – २६ नोव्हेंबर – तिरुवनंतपुरम
तिसरा T20I – २८ नोव्हेंबर – गुवाहाटी
चौथी T20I – १ डिसेंबर – रायपूर
पाचवी T20I – ३ डिसेंबर – बेंगळुरू