इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे प्रत्येक पक्ष आपली जोरदार तयारी करत आहे. त्यात राज्यात महायुती व महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्यामुळे यातील घटक पक्ष किती जागा लढणार यावर नेहमी चर्चा होते. दरम्यान एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट फार्मूलाच सांगितला आहे.
या मुलाखतीत फडणवीस यांनी भाजप २६ तर शिंदे व अजित पवार गट २२ जागा लढवणार असल्याचे निश्चित झाल्याचे सांगितले. पण, या २२ पैकी कोणता पक्ष किती जागा लढवेल हे मात्र सांगितले नाही. हा फार्मूला सांगतांना त्यांनी विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याची परंपरा असली तरी त्यांच्या एकुण कामाबाबत त्यावर चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे सांगून त्यांनी सत्ताधारी खासदारांची धगधग वाढवली आहे.
देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा ३ डिसेंबरला लागले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरु होईल. या पाच राज्यातील निकालांवरही बरंच काही अवलंबून आहे. या फार्मूलामध्ये शिंदे गट व अजित पवार गट यांना २२ जागा मिळणार आहे. त्यात कोणत्या पक्षाला किती मिळतात यावर महायुतीचे भविष्य अवलंबून आहे. दोन्ही गटांना समान जागा मिळाल्या तर वाद नाही. पण, त्यात कमी जास्त झाले तर तो महायुतीत कळीचा मु्द्दा ठरणार आहे.