इंडिाय दर्पण वृत्तसेवा
नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे दि. ५ ऑगस्ट रोजी या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहायक लेखा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक, लघु लेखक (निम्नश्रेणी), लघु लेखक (उच्चश्रेणी), कनिष्ठ सहायक लेखा या ८ संवर्गातील पदांसाठी दि. ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान आयबिपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे.
यासंदर्भातील जिल्हा परिषद पदभरतीच्या सुधारित वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन हे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य जिल्हा निवड समिती आशिमा मित्तल यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व परीक्षार्थींनी याबाबत नोंद घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
हॉलतिकीट डाऊनलोड कुठून करावे – जिल्हा परिषद पदभरतीतील ८ संवर्गाच्या परीक्षा या ७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान होणार असून आयबिपीएस कंपनीच्या http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 या संकेतस्थळावरून विद्यार्थांना हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत.
कुठल्या पदासाठी कधी होणार परीक्षा –
दि.७ ऑक्टोबर – १) रिगमन (दोरखंडवाला), २) वरिष्ठ सहायक (लेखा)
दि.८ ऑक्टोबर – १) विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
दि. १० ऑक्टोबर – १) विस्तार अधिकारी (कृषी)
२) आरोग्य पर्यवेक्षक
दि.११ ऑक्टोबर – १) लघुलेखक (निम्नश्रेणी),
२) लघुलेखक (उच्चश्रेणी),
३) कनिष्ठ सहायक (लेखा)