शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देश-विदेशातून लोक शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. हे श्रद्धाळू भक्तगण दानपेटीत दान टाकत असतात. दिवाळीच्या सुट्टीमध्ये दहा दिवसांमध्ये तब्बल १७ कोटी ५० लाख ५६ हजार ०८६ इतके दान भक्तांनी साईंच्या झोळीत टाकले आहे.
दहा ते वीस तारखेदरम्यान, असेलल्या दिवाळीच्या सुट्टीत असंख्य साईभक्तांनी साईबाबांचे दर्शन घेतले. या दहा दिवसांच्या उत्सवात संस्थानला विविध स्वरुपात तब्बल १७ कोटी ५० लाख ५६ हजार ०८६ एवढे दान मिळाले. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहा दिवसांत साईबाबांच्या चरणी दररोज पावणे दोन कोटींचे दान प्राप्त झाले.
शिर्डी देवस्थानला रोख स्वरुपात रुपये सात कोटी २२ लाख ३९ हजार ७९४ रुपये दक्षिणा पेटीत प्राप्त झाले. देणगी काऊंटरवर तीन कोटी ९८ लाख १९ हजार ३४८ रुपये, पी.आर.ओ.सशुल्क पास देणगी २ कोटी ३१ लाख ८५ हजार ६००, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर तीन कोटी ७० लाख ९४ हजार ४२३, तर सोने ८१० ग्रॅम रक्कम रुपये २२ लाख ६७ हजार १८९चांदी ८२११.२०० ग्रॅम रक्कम रुपये ४ लाख ४९ हजार ७३१ अशा स्सरुपाचे दान मिळाले.