सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी असे सुरु आहे प्रयत्न…

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 25, 2023 | 11:20 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
F v9kSNbsAAPu h

.

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या काटिबद्धतेसह, केंद्र सरकार सक्रियपणे, उत्तरकाशी मधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांच्या बचावाचे अभियान वेगाने राबवत आहे. या बोगद्यातील २ किमी पूर्ण झालेल्या कॉक्रीटच्या भागावर लक्ष केंद्रित करून बचाव करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी विविध सरकारी यंत्रणा, अथकपणे त्यांना दिलेल्या विशिष्ट कार्यात गुंतलेल्या असून, कामगारांच्या सुरक्षित सुटकेसाठी काम करत आहेत. या स्थळी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ उपस्थित आहेत. अडकलेल्या मंजुरांचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी, सरकार सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. दरम्यान या बचावकार्य किती दिवस अजून चालेल हे निश्चित नाही. परदेशातून आलेल्या एकाने तर

बचाव कार्यातील महत्वाची अद्ययावत माहिती :

  1. एनचआयडीसीएल लाईफलाईन चे प्रयत्न :
    ताजे शिजवलेले अन्न आणि ताजी फळे नियमित अंतराने दुसऱ्या लाईफ लाइन (150 मिमी व्यास) सेवेचा वापर करून बोगद्याच्या आत पोहोचवली जात आहेत. संत्री, सफरचंद, केळी इत्यादी पुरेशा फळांसह औषधे आणि क्षारांचाही या हा पाईपमधून नियमित अंतराने पुरवठा करण्यात येत आहे. भविष्यातील साठ्यासाठी अतिरिक्त सुक्या अन्नाचाही पुरवठा केला जात आहे.
    एसडीआरएफ ने विकसित केलेली सुधारित संपर्क व्यवस्था स्थापन करून, अडकेल्या मंजुरांशी नियमित संपर्क ठेवला जात आहे. अडकलेले सर्व मजूर सुरक्षित आहेत.
  2. एनएचआयडीसीएलचे आडवे बोरिंग
    22 नोव्हेंबर 2023 रोजी, रात्री पाऊण वाजता सुरू झालेले ऑगर ड्रिलिंगचे खोदकाम ड्रिलिंग पाईपच्या समोर धातूची वस्तू (लॅटिस गर्डर रिब) आल्याने थांबविण्यात आले त्यामुळे पाईप पुढे टाकता आले नाही. गॅस कटर वापरून धातूच्या वस्तू (लॅटिस गर्डर रिब) कापण्याचे काम पूर्ण झाले आहे. नवव्या पाईपच्या पुशिंगने अतिरिक्त 1.8 मीटर अंतर गाठले आहे . मात्र हे काम करत असतांना, किरकोळ कंपन आल्याचे लक्षात आले, म्हणून ऑगर वापरायला लागलेल्या शक्तीचा अंदाज घेण्यासाठी, ऑगर किंचित मागे ढकलले गेले. त्यावेळी कामात अडथळे निर्माण झाले.
    काँक्रीट जलद गतीने कडक होण्यासाठी प्रवेगक वापरून ऑगर मशीनसाठी प्लॅटफॉर्म मजबूत करण्याचे काम पूर्ण
    ऑगर मशीनसाठीचा प्लॅटफॉर्म अँकरिंग, बोल्टिंग, काँक्रिटिंग फाउंडेशन इत्यादी मार्गांनी मजबूत करण्यात आला आहे.
    तसेच पाईपच्या इतर कोणत्याही नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी ऑगरला पूर्णपणे मागे खेचणे आवश्यक होते. अऑगर खेचून बाहेर काढणे पूर्ण झाले आहे. जीपीआर (ग्राउंड पेनिट्रेशन रडार) तपासणी पूर्ण झाली आहे. वाकलेला पाईप कापण्यासाठी वेल्डरची टीम पाईपच्या आत गेली आहे. वाकलेला पाईप कापण्याचे काम पूर्ण झाले आहे .
    ऑगर पुनर्रजोडणीचे काम पूर्ण झाले आणि सर्व ऑगर्स दुपारी अडीच वाजेपर्यंत पुन्हा बसवण्यात आले.
    10 वा पाईप (4.7 मीटर लांबी) ओढण्याचे काम 24.11.2023 रोजी संध्याकाळी 16. 25 वाजता सुरू झाले आणि 24.11.2023 रोजी संध्याकाळी 5. 50 वाजेपर्यंत 2.2 मीटर लांबीचा पाईप टाकण्यात आला, परिणामी एकूण लांबी 46.9 मीटर झाली आहे .
    10 वा पाईप ढकलताना आणखी अडथळा दिसून आला आणि पाईप ढकलणे थांबवावे लागले. त्यानंतर, ऑगर मागे ओढण्याचे काम सुरु झाले. 15 मीटर लांबीचे ऑगर सुरुवातीला खेच ल्यावर बाहेर आला आणि त्यानंतर औगरचे सांधे तुटले आणि औगर अडकल्यामुळे एका दमात ऑगर खेचण्यास अडचणी येत आहेत.
    त्यानंतर गॅस कटिंगद्वारे लहान तुकड्यांमध्ये ऑगरचे हाताने कटिंग आणि पाईपच्या (800 मिमी) आतून ते बाहेर काढणे सुरु केले. आत्तापर्यंत, एकूण 46.9 मीटर पैकी 22.6 मीटर लांबीचे ऑगर काढले गेले आहेत आणि ही प्रक्रिया सुरू आहे.
  3. सतलुज जल विद्युत निगम-SJVNL द्वारे बचावासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग:
    ड्रिलिंग मशिनरी घटनास्थळी दाखल झाल्या.
    ड्रिलिंग मशिन सुरू करण्यासाठी प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले आहे. बोगद्यावरील ड्रिलिंग पॉईंटचे मार्किंग Ch 300 L/S. या ठिकाणी जीएसआय , आरव्हीएनएल आणि ओएनजीसी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम रूप देण्यात आले आहे.
    मशीनची जोडणी सुरू झाली आहे.
  4. टिहरी हाइड्रो विकास निगम लिमिटेड (टीएचडीसीएल) द्वारे बरकोटच्या बाजूला हॉरीझॉन्टल ड्रिलिंग:
    टीएचडीसीएलने बरकोटच्या टोकापासून बचाव बोगद्याचे बांधकाम सुरू केले आहे, चार स्फोट आधीच पूर्ण झाले आहेत.
    शॉटक्रेटिंग आणि रिब इरेक्शन काम पूर्ण झाले आहे आणि अतिरिक्त रिब फॅब्रिकेशनचे काम प्रगतीपथावर आहे.
  5. RVNL द्वारे जमिनीला काटकोनात उभे खोदकाम :
    मजुरांना वाचवण्यासाठी काटकोनात खोदकाम करण्यासाठी लागणारी सूक्ष्म बोगद्याची उपकरणे नाशिक आणि दिल्लीहून घटनास्थळी पोहोचली आहेत.
    प्लॅटफॉर्म 25.11.2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 27.11.2023 पर्यंत उपकरणे उभारली जातील.
  6. सिल्क्यारा टोकाला RVNL द्वारे उभे खोदकाम (6 इंच):
    बीआरओ ने 1150 मीटरचा प्रवेश रस्ता पूर्ण केला आहे आणि RVNL ला सुपूर्द केला आहे. बीआरओ ने ड्रिलिंगसाठी उपकरणे कामाच्या ठिकाणी आणली आहेत.
    RVNL ला विजेची जोडणी देण्यात आली आहे.
  7. ओएनजीसी द्वारे बरकोटच्या दिशेने उभे खोदकाम
    ओएनजीसी च्या खोदकाम पथकाने 20.11.2023 रोजी साइटला भेट दिली.
    इंदूर येथून एअर ड्रिलिंग रिग मशीन घटनास्थळी पोहोचले आहे.
    क्षेत्र सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ओएनजीसी द्वारे अहवाल सादर केला जाईल.
  8. THDCL/लष्कर/कोल इंडिया आणि NHIDCL ची संयुक्त टीम मॅन्युअल-सेमी मेकॅनाइज्ड पद्धतीने ड्रिफ्ट टनेलचे खोदकाम करेल:
    ड्रिफ्ट डिझाइन पूर्ण झाले आहे (1.2 मी X 1.5 मी विभाग)
    साहित्य घटना स्थळी पोहोचले.
    21.11.2023 रोजी लष्कराच्या वेल्डर्सनी फॅब्रिकेशन सुरू केले.
    18 फ्रेम्स तयार करण्यात आल्या आहेत.
  9. बीआरओ द्वारे रोड कटिंग आणि सहाय्यक काम:
    बीआरओ ने SJVNL आणि RVNL द्वारे उभ्या ड्रिलिंगसाठी अप्रोच रोडचे बांधकाम पूर्ण केले आहे.
    ONGC द्वारे करण्यात आलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या आधारावर बीआरओ, ONGC साठी अप्रोच रोड देखील बनवत आहे. 5000 मीटरपैकी 950 मीटरचा अप्रोच रोड तयार करण्यात आला आहे.
    पार्श्वभूमी:
    12 नोव्हेंबर 2023 रोजी, सिल्क्यरा ते बरकोट दरम्यान बांधल्या जाणाऱ्या बोगद्यात सिल्क्यराच्या बाजूला 60 मीटर भागात बोगद्याचा भाग कोसळला होता. त्यानंतर बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुटका करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने साधन सामुग्रीची जमवाजमव सुरु केली. तांत्रिक त्रुटी, हिमालयातील खडतर भौगोलिक स्थिती आणि अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीमुळे वर्तवण्यात आलेली समस्या सोडवणुकीची टाइमलाइन (अपेक्षित काळ) बदलू शकते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या रविवार, २६ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post

पुण्यातील वारसा इमारती असलेल्या डेव्हिड आणि जेकब ससून इमारतीचे असे होणार नूतनीकरण..

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
andolan 1
राज्य

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते करणार विदर्भ दौरा…आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराशी साधणार संवाद

सप्टेंबर 8, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये निषेध मोर्चात १८ जणांचा मृत्यू, २५० हून अधिक लोक जखमी

सप्टेंबर 8, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

आता राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम…

सप्टेंबर 8, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

रिलायन्स रिटेल पहिल्याच दिवशी कमी जीएसटी दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणार….

सप्टेंबर 8, 2025
NMC Nashik 1
संमिश्र वार्ता

नाशिक महानगरपालिकेत प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सुचना अर्जावर या तारखेला होणार सुनावणी

सप्टेंबर 8, 2025
Untitled 3
मुख्य बातमी

मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक…विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 8, 2025
Next Post
Pne Photo DCM Sasun Build. Pahani 25 Nov 1 750x375 1

पुण्यातील वारसा इमारती असलेल्या डेव्हिड आणि जेकब ससून इमारतीचे असे होणार नूतनीकरण..

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011