नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- २२ व २३ नोव्हेंबर रोजी वाहकांकडून पुकारण्यात आलेल्या संपामुळे नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंक बसेस मार्गस्थ होऊ शकल्या नाही. त्यामुळे प्रवाशांना देखील गैरसोयीला सामोरे जावे लागले. अशा प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करतांनाच नियमित पासधारकांचे संपामुळे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता सिटीलिंक प्रशासनाच्यावतीने अश्या पासधारकांच्या पासच्या
मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- ज्या पासधारकांच्या पासचा २२ नोव्हेंबर २०२३ रोजी अंतिम दिवस होता अशा पासधारकांना एक दिवसाच्या पासचा परतावा देण्यात येणार आहे.
- ज्या पासधारकांच्या पासचा २३ नोव्हेंबर २०२३ रोजी अंतिम दिवस होता अशा पासधारकांना दोन दिवसाच्या पासचा परतावा देण्यात येणार आहे.
- ज्या पासधारकांच्या पासची मुदत २४ नोव्हेंबर २०२३ किंवा नंतर संपत आहे अशा पासधारकांच्या पासची मुदत दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. तरी पास धारकांनी वरील निर्णयाची नोंद घ्यावी. तसेच यासंदर्भात कोणतीही अडचण असल्यास कृपया ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.