इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मक्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यावरही, संबंधित लोकांसोबत चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय प्रेटोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. त्याचबरोबर कृषी आणि अन्न तसेच सार्वजनिक वितरण मंत्रालयासोबत झालेल्या चर्चेत, मक्याला एम प्रमुख चारा म्हणून विकसित करण्यावर चर्चा झाली.
गेल्या काही वर्षात, मका लागवड क्षेत्रात, हेक्टरी पिकात आणि उत्पादनात वाढ झाली असल्याबद्दलही यावेळी चर्चा झाली. कृषी आणि सीएफपीसी शी सल्लामसलत करुन या क्षेत्रातील काम सुरू करण्यात आले आहे, यासोबतच, अधिक स्टार्च असणारी वाणे विकसित करणे, अफलाटॉक्सिन काढून मक्याच्या DDGS (ड्रायड डिस्टिलर्स ग्रेन सॉलिड्स) ची गुणवत्ता सुधारणे, जास्त स्टार्च असलेल्या नवीन बियाणांच्या वाणांची जलद नोंदणी करणे. बियाणे कंपन्यांसह डिस्टिलर्ससाठी मका प्रशिक्षण कार्यक्रम देखील सुरू करण्यात आला आहे.
देशात जैवइंधनाला चालना देण्यासाठी काल आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (एसएएफ/बायो-एटीएफ) प्रारंभिक मिश्रणाच्या टक्केवारीचे लक्ष्य समितीने निश्चित केले होते. त्यावर, MoCA, नीती आयोग, ओएमसी इत्यादी भागधारकांकडून मिळालेल्या सूचनांवर आधारित, देशात येणार्या शाश्वत विमान इंधन संयंत्रांची क्षमता आणि ATF विक्रीचा अंदाज, ATF मध्ये SAF च्या खालील प्रारंभिक मिश्रण टक्केवारी मंजूर केल्या आहेत:
- 2027 मध्ये 1% SAF सूचक मिश्रित लक्ष्य (सुरुवातीला आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी)
- 2028 मध्ये 2% SAF मिश्रित लक्ष्य (सुरुवातीला आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी)