इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सप्तपदी मधील तीन फेरे झाल्यानंतर वधूने अचानक लग्नाला नकार दिल्याची घटना उत्तरप्रदेशमधील हाथरसमध्ये घडली आहे. या लग्नात आलेल्या पाहुण्यांना हा मोठा धक्का बसला. लग्नाला नकारच द्यायला होता तर तो अगोदर द्यायला हवा होता. पण, तीन फेरे पूर्ण झाल्यानंतर नकार दिल्यामुळे सर्वांना आश्चर्यही वाटले. नातेवाईकांनी वधूचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण, वधूने बेवड्या वराशी लग्न करणार नाही असे सांगत ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्यानंतर कुटुंबियांना तिचा हा निर्णय पटला व हे लग्न मोडले.
सादाबाद येथील एका गेस्ट हाऊसमध्ये हा विवाह सोहळा होता. लग्नाचा सर्व विधी जवळपास संपत असतांना वधुला नवरा दारुडा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तीने हा निर्णय घेतला. लग्नातही तो नशेतच होता. हाथरस जिल्ह्यातील नागला नवल गावातील रहिवासी जितेंद्र (२८) हे वधुचे नाव असून तीचे फिरोजाबाद येथील भावना बरोबर लग्न होत होते. त्यावेळेस ही धक्कादायक घटना घडली.
हे लग्न मोडलेच नाही तर त्याच्या परस्पर विरोध तक्रारी दोघांनी पोलिस स्थानकात गेल्या. नव-या मुलाने मी मद्यपी नाही, मुलीचा अगोदर घटस्फोट झाला होता. पण ही वस्तुस्थिती मुलीच्या घरच्यांनी लपवून ठेवल्याचा आरोप केला. तर नवरीकडून या दारूड्या नवऱ्याने वधूच्या वडिलांकडे हुंडा म्हणून १५ लाख रुपयांची मागणी केल्याचे म्हटले. या दोन्ही कुटुंबियांना पोलिस अधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर हे लग्न तीन फेरे घेऊन मोडले. त्यामुळे अर्ध्यावरती डाव मोडला अधूरी एक कहाणी असेच म्हणावे लागेल..