इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फायटेर प्लेन ‘तेजस’मधून भरारी घेतल्यानंतर आज सोशल मीडियावर फोटो शेअर केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की,तेजसवर यशस्वीरित्या प्रदक्षिणा पूर्ण केली. हा अनुभव आश्चर्यकारकपणे समृद्ध करणारा होता, आपल्या देशाच्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढवणारा होता आणि मला आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावादाची नवीन भावना देऊन गेली.
कर्नाटकमधील बंगळूर येथील येलहंका एयरबेसमधून त्यांनी तेजसमधून भरारी घेतली. तेजस विमानाची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) केली आहे. तेजस हे सिंगल इंजिन असणार विमान असून ‘मेक इन इंडिया’ फायटर जेट आहे. तेजस विमानाचे दोन स्क्वॉड्रन भारतीय हवाई दलात दाखल झाल्या आहेत.
मोदी संरक्षण उत्पादनांच्या स्वदेशी उत्पादनावर भर देत आहेत. त्यांनी त्यांच्या सरकारने भारतात त्यांच्या उत्पादनाला आणि त्यांच्या निर्यातीला कशा प्रकारे प्रोत्साहन दिले आहे यावर प्रकाश टाकला आहे. अनेक देशांनी तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे आणि पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेन डिफेन्स कंपनी जीई एरोस्पेसने एमके २ तेजससाठी संयुक्तपणे इंजिन तयार करण्यासाठी ‘एचएएल’सोबत करार केला होता.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या वर्षी एप्रिलमध्ये सांगितले होते, की २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीने १५ हजार ९२० कोटी रुपयांचा उच्चांक गाठला आहे. देशासाठी ही उल्लेखनीय कामगिरी असल्याचे ते म्हणाले होते.