कोल्हापूर : सहा माहिन्यापूर्वी एसटी बँकेच्या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली १९ संचालक निवडून आले होते. आता त्याच संचालकांनी सदावर्ते यांना धक्का दिला आहे. १९ पैकी १४ संचालक सदावर्तेंच्या विरोधात गेल्यामुळे या बँकेतील सदावर्ते यांचे वर्चस्व आता कमी झाले आहे.
सदावर्ते याच्या नेतृत्वाखाली एसटी बँकेत एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिकृत संघटनेला धूळ चारत सदावर्ते यांचे पॅनेल विजयी झाले; पण त्यानंतर बँकेच्या कारभारात अनावश्यक हस्तक्षेप सुरू झाल्यामुळे नाराजीचा सूर वाढत गेला. सदावर्ते यांच्या मेहुण्याची बँकेत संचालक म्हणून नेमणूक झाल्यामुळे अनेक संचालक चांगलेच नाराज आहेत. त्यामुळे १४ संचालक सदावर्ते यांच्या विरोधात गेल्याचे बोलले जात आहे.
हे सर्व संचालक अज्ञानस्थळी गेल्यानंतर त्यांनी सदावर्तेव आरोप करतांना सांगितले की, सदावर्ते हे समाजात द्वेष पसरत आहेत. सामान्य गरीब एसटी कर्मचाऱ्यांचा केवळ राजकारणासाठी उपयोग करत आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला दांडी मारून हे संचालक अज्ञातस्थळी गेल्यानंतर या विषय़ाची चर्चा सुरु झाली.