इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रेल्वेमध्ये अश्लिल इशारे करणारे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले. या इशा-यामुळे त्याला तब्बल १५ सेंकद एका महिलेने चांगलाचा चपलेने मार दिला आहे. हा व्हिडिओ घर कलेश नावाच्या युजरने एक्सवर शेअर केला असून त्यानंतर या घटनेवर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे.
खरं तर महिलांची छेड काढणारे नवे नाही. पण, सर्वच महिला त्यांना अद्दल घडवत नाही. अनेक महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. रेल्वेमधील या महिलेने मात्र तसे केले नाही. अश्लिल इशारे करणा-याला अशी अद्दल घडवली की पुन्हा तो असे इशारे तर सोडाच..महिलेकडे बघणार सुध्दा नाही.
या व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला आहे. त्यामुळे या महिलेच्या धैर्याचे कौतुकही होत आहे.