पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्नीने घरगुती भांडणातून झालेल्या वादातून पतीच्या तोंडावर ठोसा मारून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी परिसरातील उच्चभू सोसायटीत घडली. शुक्रवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत बांधकाम व्यावसायिक असलेले निखील पुष्पराज खन्ना (३६) यांचा मृत्यू झाला आहे.
या घरगुती भांडणाचे कारणही पुढे आले आहे. वाढदिवसाला दुबईला का नेले नाही, मनासारखे गिप्ट का दिले नाही म्हणून हे भांडण झाले.
याप्रकरणी पोलिसांनी रेणुका निखील खन्ना (३८) यांना ताब्यात घेतले आहे. या धक्कादायक घटनेमुळे या परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. पती व पत्नीमध्ये वाद होतात. पण, त्यातून खून होण्याचा प्रकार सर्वांनाच धक्का लागला.
पत्नी रेणुकाने पती निखील यांच्या तोंडावर ठोसा मारला. त्यानंतर सासरे डॉ. खन्ना यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घरी आले. त्यांनी निखील यांना तपासले. पण, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी याबाबत वानवडी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी रेणुकाला ताब्यात घेतले.