नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग शिक्षक-संघाच्या १ नोव्हेंबर, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत नव्याने प्रारुप मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या आलेल्या आहेत.
सदर मतदार याद्या २३ नोव्हेंबर २०२३ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये व सर्व तहसिल कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. या सर्व ठिकाणी प्रारुप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
प्रारुप मतदार यादीमधील दुरुस्तीबाबत दावे अथवा हरकती असल्यास ९ डिसेंबर २०२३ पर्यंत स्वीकारण्यात येतील, असे उपायुक्त (सा.प्र.) नाशिक विभाग नाशिक यांनी कळविले आहे.