नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रामतीर्थ गोदावरी सेवा समिती व इस्कॉन नाशिक यांच्या वतीने कार्तिक शुद्ध पौर्णिमेला सकाळी पहाटे ५ वाजता श्रीक्षेत्र रामतीर्थ गंगा गोदावरी मंदिरा जवळ रामकुंड गोदावरीत कार्तिक मास स्नान पूर्णत्व पर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संपूर्ण कार्तिक मास स्नान पर्व सोहळ्याचे अध्यक्ष जयंतराव गायधनी, प्रमुख राजेंद्र फड, स्नान पर्व समाप्तीचे प्रमुख नृसिंह कृपा दास यांनी दिली आहे.
कार्तिक मासातील गोदा स्नानाने संपूर्ण मास स्नान केल्याचे पुण्य आपल्या पदरात येऊन मनावरील पाप कर्माचे मळभ दूर होत असते अशी धारणा आहे. त्यानुसार कार्तिकी पौर्णिमेचे औचित्य साधून रामतीर्थ गोदावरी सेवा समिती व इस्कॉनच्या वतीने कार्तिक मास स्नान पूर्णत्व पर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अंजनेरी नाशिक येथील रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष परम् श्रद्धेय स्वामी श्रीकंठानंद, प्रमुख पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत तथा आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते परमपूज्यस्वामी भक्तीचरण दास महाराज, इस्कॉन नाशिकचे उपाध्यक्ष श्रीमान सहस्त्रशीर्ष प्रभु यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत स्नान विधी संपन्न होणार आहे.
नाशिकसह परिसरातील सर्व भाविकांनी श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे अवश्य उपस्थित राहून विधीवत वैदिक व पौराणिक स्नानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष शांताराम भानोसे,नृसिंहकृपा दास सचिव मुकुंद खोचे, कोषाध्यक्ष अशिमा केला, सहसचिव चंद्रशेखर पंचाक्षरी, सदस्य शैलेश देवी, डॉ. अंजली वेखंडे, प्रफुल्ल संचेती, राजेंद्र फड, चिराग पाटील, शिवाजी बोंदाडें, प्रतिक शुक्ल यांच्यावतीने करण्यात आले आहे.