इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशमधील झाशी येथे मंसिल मातेला बळी देण्यासाठी एका तरुणाने आपलाच गळा मंदिरातच कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना झाल्यानंतर काही तरुणांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिस मंदिरात आले. त्यांनी या तरुणाला मेडिकल कॅालेजच्या दवाखान्यात भर्ती केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.
बनगाव येथे राहणार हा तरुण असून त्याचे नाव नीरज रायकवार (२६) असे आहे. या घटनेबाबत एसपी ज्ञानेंद्रकुमार यांनी सांगितले की, हा युवक दारुच्या नशेत होता. तो बनगुवा गावाच्या शेजारी असलेल्या मंसिल माता मंदिरात गेला. येथे ठेवलेल्या वाटीने तो गळा कापू लागला. या घटनेची माहिती येथे असलेल्या काही तरुणांना झाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. या तरुणाची विचारपूस केल्यानंतर तो म्हणाला की मला माझा बळी द्यायचा होता.
खरं तर बळी देण्याच्या देशभर अनेक विविध प्रथा आहे. पण, त्यात प्राण्यांचाच बळी दिला जातो. पण, झाशीमध्ये या तरुणाचे हे कृत्य धक्कादायक आहे. देवावर श्रध्दा असावी. त्यासाठी सर्व जण वेगवेगळी उपासणा करतात. पण, असे जीवघेणे प्रकार मात्र धक्कादायकच आहे.