इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः राष्ट्रवादी कुणाची यावर आज सायंकाळी ४ वाजेपासून केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी दोन्ही गटातील प्रमुख नेते उपस्थितीत राहणार आहे.
याअगोदर झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचीच नव्हे, तर पदाधिकाऱ्यांचीही प्रतिज्ञापत्रे बोगस असल्याचा आरोप शरद पवार गटाचे वकील मनु सिंघवी यांनी केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळेस मागचाच युक्तिवाद पुन्हा का करीत आहात, असा सवाल करीत नाराजी व्यक्त केली होती. यावेळी अजित पवार यांच्या अध्यक्ष निवडीलाच शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यावर होणा-या सुनावणीत शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहे. तर अजित पवार गटातर्फे खा.सुनील तटकरेसह प्रमुख नेते उपस्थितीत राहणार आहे.