नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऐतिहासिक तिर्थक्षेत्र मांगीतुंगीला जाणा-या मांगीतुंगी फाटा येथे सर्व प्रकारचे बसेसला थांबा मिळणेबाबत भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस बिंदुशेठ शर्मा यांनी एसटी महामंडळाकडे मागणी केली होती. त्यानंतर एसटीने
या मागणीप्रमाणे सटाणा, तहाराबाद मार्गे धावणा-या सर्व बसेस मांगीतुंगी फाटा येथे थांबवुन प्रवासी चढ उतार करणेबाबतच्या सुचना सर्व संबधीतांना देण्यात दिल्या आहे.
विभाग नियंत्रक, रा.प. जळगाव, धुळे, अहमदनगर, पालघर, ठाणे यांना एसटी व्यवस्थापनाने विभागाच्या नंदुरबार, साक्री, नवापुर, अक्कलकुवा मार्गांवर धावणा-या सर्व बसेस मांगीतुंगी फाटा येथे थांबवुन प्रवासी चढ उतार करतील अशा सुचना दिल्या आहे. तसेच इंटीआय मशीन मध्ये सदर थांबे समाविष्ट करण्यात यावे असेही सांगितले आहे.
बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी परिसराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक लढाई याच भागात झाली. मांगीतुंगी येथे १०८ फूट उंच भगवान ऋषभदेव मूर्ती आहे. हे स्थळ जैन धर्मियांचे तीर्थस्थळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी देशभरातून येणा-या भाविकांसाठी बससेवा महत्त्वाची आहे. त्यामुळे हे बस थांबे एसटी प्रशासनाने दिली आहे.