इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढत टी -२० मालिकेतील पहिल्याच रोमांचकारी सामन्यात भारताने विजय मिळवला. विजयासाठी एक धावा व अवघा एक बॅाल शिल्लक असतांना रिंकू सिंह याने सिक्स मारत हा विजय मिळवून दिला. या सामन्यात भारतीय संघाटने १९.५ ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावत हा सामना जिंकला.
या सामन्यात सूर्यकुमार यादवने ८० तर ईशान किशन याने ५८ धाव केल्या. रिंकू सिंह याने नाबाद २२ धावा केल्या. यशस्वी जयस्वाल २१ तर तिलक वर्मा १२ धावा केल्या. अक्षर पटेल २ रन्स करुन आऊट झाला. तर ऋतुराज गायकवाड, रवि बिश्नोई आणि अर्शदीप सिंह व मुकेश कुमार या तिघांना भोपळाही फोडता आला नाही.
पाच सामन्यांची ही या मालिका असून त्यात भारताने १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून तनवीर सांघा याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर जेसन बेहरनडोर्फ, मॅथ्यू शॉर्ट आणि सीन एबोट यी तिघांनी १ विकेट मिळवली.
ऑस्ट्रेलियाचा डाव
ऑस्ट्रेलियाकड़ून स्टीव्ह स्मिथने ४१ चेंडूत ५२ धावा केल्या. जोस इंग्लिसने ४७ चेंडूत शतक ठोकलं. त्यानंतर स्टोइनिस ७ आणि टीम डेविड १९ धावांवर नाबाद राहिला.