नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई- आग्रा महामार्गावर पाडळी फाट्याजवळ तिन गाड्यांच्या अपघातात प्रवासी ओमिनीतील आठ ते नऊ जण जखमी झाले. गुरुवारी रात्री सात वाजता हा अपघात झाला. मुंबई कडून नाशिककडे जाणारी प्रवासी ओमिनीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामुळे ओमिनी गाडी उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. ओमनीला धडक दिलेल्या वाहनचालक गाडी घेऊन फरार झाला.
या ओमिनीमध्ये आठ ते नऊ जण जखमी झाले. या अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर जखमी रुग्णांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या अपघातातील ओमिनी क्रं.MH.04.GJ.5807 हा असून ट्रकचा KA.38.A.5682 आहे. या अपघातात गणेश गांगुर्डे (३२) शोभा जानेराव (६२), शशिकला जानेराव (५५), तन्मय जानेराव (१०) रामेश्वर पवार (४०, श्रध्दा मोपनल (२४) नासिक, मोबिन अन्सारी (५१) यातील बहुतांश हे नाशिकचे रहिवासी आहे. दोन जणांची नावे मिळाली नाही.