नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर, देवी मंदिर रोड (नायगाव रोड), सिन्नर येथे बुधवार २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
या मेळाव्यात जिल्ह्यातील सुझुकी मोटर्स ली.गुजरात हे औद्योगिक आस्थापनात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २३ वर्षे ११ महिने असावे. उमेदवार हा इयत्ता १० वी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराने सन २०१८ पासून पुढे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फिटर, ईलेक्टिशियन, मोटर मॅकेनिक व्हेईकल, टर्नर, मशिनिष्ट, टुल ॲण्ड डाय मेकर, वेल्डर, ट्रॅक्टर मॅकेनिक, पी.पी.ओ, डिझेल मॅकेनिक आणि पेंटर यापैकी ट्रेड उत्तीर्ण असावा. उमेदावाराने सोबत स्वत:चे आधार कार्ड, इयत्ता १० वी गुणपत्रक, आय.टी.आय. गुणपत्रक, दोन फोटो व इतर अनुषंगिक कागदपत्रे (एक झेरॉक्स सेटसह) आणावा. असेही प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर यांनी कळविले आहे.