इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोरोनाचे संकट दूर होत नाही तोच आता चीनमधील एका नव्या आजाराने जगाची झोप उडवली आहे. कोरोनाची सुरुवात चीनमध्ये अगोदर झाली. त्यानंतर जगभर तो पसरला. त्यामुळे या नव्या आजाराची अगोदरच जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली हे आता बरं झालं आहे. या नव्या आजारामुळे चीनमघधील सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. या नव्या आजारात लहान मुले विळख्यात अडकली आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने चीनला या आजाराची माहिती देण्यास सांगितले आहे. चीनमधील लहान मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखे आजार पसरत आहेत. रुग्णालयांमध्ये हजारो मुले दाखल झाली असून, त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. या रहस्यमयी आजाराच्या उद्रेकासाठी कोविड-१९ निर्बंध शिथिल केल्याचा ठपका जागतिक आरोग्य संघटनेने ठेवला आहे. आजारी मुलांमध्ये इन्फ्लूएंझा, सार्स को २, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया यासंबंधी चीनकडन जागतिक आरोग्य संघटनेने माहिती मागवली आहे. चीनमधील रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांमध्ये कोविडसारखीच लक्षणे दिसत आहेत.
या आजारातील मुलांना सतत ताप येत आहे. त्यांच्या फुफ्फुसांत गाठी तयार होत आहेत. चीनच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी लाबंच लांब रांगा लागल्या आहेत. रुग्णांना उपचारासाठी रांगेत वाट पाहवी लागते. बेडही शिल्लक नाहीत. काही शिक्षकांनाही या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे चीनमधील काही शाळा बंद करण्यात आल्या आहेत.