इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मोबाईल फोन आल्यानंतर गेल्या काही वर्षात त्यात अनेक बदल होत गेले. पण, सीम कार्ड मात्र काही बदलले नाही. त्याच्याशिवाय फोन सुरु करणे शक्य नव्हते. पण, आता हे सिमकार्डच इतिहास जमा होणार आहे. त्याच्याएेवजी आता ई – सिम कार्ड येणार आहे. ई-सिम म्हणजे इंबेडेड सब्सक्राइबर आइडेंटिटी माड्यूल. ई-सिम वापरणे केवळ मोबाइल फोनमध्ये नाही तर स्मार्टवॉच व इतरही त्याचा वापर होतो. हे सिम फिजिकल सिम पेक्षा बरेच वेगळे आहे. ई-सिमला फोन मध्ये टाकण्याची गरज नाही. हे टेलीकाम कंपनीकडून ओवर-द-एयर एक्टिवेट केले जाते.
ग्राहकांच्या अधिक सुरक्षिततेसाठी हे ई-सिम आले असून, ग्राहकांना कोणत्याही सिम कार्डशिवाय कॉलिंग, एसएमएस, डाटा या सेवा मिळतील. सिम कार्डची गरज संपेल. देशात लवकरच देशात ई-सिम युग अवतरेल असे ‘एअरटेल’चे ‘सीईओ’ गोपाल विट्टल यांनी सांगितले आहे. त्यांच्या मते सिम कार्डपेक्षा ई-सिम हा चांगला पर्याय ठरेल. स्मार्टफोन कंपन्या आणि डेटा डिव्हाईस निर्मिती कंपन्या ई-सिमचा पर्याय देत आहेत. टेलिकॉम कंपन्या ई-सिमची ऑफर देत आहेत. फोन चोरी झाल्यास ई-सिममुळे डाटा ट्रान्सफर तर करता येईलच. पण या चोऱ्यांच्या प्रकारांना आळा बसेल असेही त्यांनी सांगितले.
फोन चोरी गेला तर ट्रक करणे सोपे
सिमच्या वापरामुळे सिम कार्ड हरवण्याचे, चोरी होण्याची भीती संपते. मोबाईल चोरल्यानंतर चोरटे हात साफ करतात. त्यातील सिम कार्ड फेकून देतात. चोरीचा मोबाईल काही तासातच देशातील दुसऱ्या कोपऱ्यातील शहरात विक्री होतो; पण आता ई-सिममुळे या फोनचे लोकेशन कळेल. तो ट्रॅक करणे सोपे होईल.
ई-सिमचे हे आहे फायदे
ई-सिम सेवेमुळे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे अनेक डिव्हाईसशी एकाचवेळी एकाच क्रमांकावरून जोडणी करता येईल. मोबाईल फोनपासून ते स्मार्टवॉचपर्यंत सर्व डिव्हाईस इंटरकनेक्ट करता येतील. मोबाईलऐवजी स्मार्टवॉचचा वापर करायचा आहे, अथवा इतर अनेक मोबाईलचा वापर करायचा असेल तर ई-सिमचा फायदा होतो.
या कंपनीने दिला पर्याय
ई-सिमचा वापर करण्याअगोदर फोनमध्ये तशी व्यवस्था आणि त्याची तशी क्षमता आहे का हे तपासावे लागेल. सध्या जिओ, व्होडाफोन आणि एअरटेल ई-सिमचा पर्याय देत आहेत.