नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दाखल झालेल्या गुन्ह्यावरून प्रतिबंध कारवाई करून अटक न करण्याकरिता शिरपूर पोलिस स्थानकातील पोलिस नाईक लक्ष्मीकांत पंढरीनाथ टाकणे यांना १५०० रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले.
या कारवाई बाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे शिरपूर येथील रहिवासी असून त्यांचे विरुद्ध शिरपूर शहर पो.स्टे .येथे दाखल झालेल्या गुन्ह्यावरून प्रतिबंध कारवाई करून अटक न करण्याकरिता लक्ष्मीकांत पंढरीनाथ टाकणे यांनी तक्रारदार यांचेकडे पंधराशे रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान नमूद आलोसे यांनी तक्रारदार यांचे कडे पंधराशे रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध शिरपूर शहर पोस्टे जि. धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई*
- युनिट – ला.प्र.वि. धुळे.
- तक्रारदार- पुरुष, 33 वर्ष.
- आलोसे – लक्ष्मीकांत पंढरीनाथ टाकणे , वय – 33 वर्ष, (पो. नाईक ब. न. 1341), नेमणूक – शिरपूर शहर पो.स्टे., जिल्हा धुळे. रा.- शिवराम पाटील नगर, प्लॉट नंबर ४० अ, दंडवते नगर, पाण्याच्या टाकीजवळ, शिरपूर, जिल्हा धुळे.
- लाचेची मागणी- 1,500/- रू
- लाच स्वीकारली – 1,500/- रू दि. 22/11/2023 रोजी स्वीकारले.
- लाचेचे कारण – यातील नमूद तक्रारदार हे शिरपूर येथील रहिवासी असून त्यांचे विरुद्ध शिरपूर शहर पो.स्टे .येथे दाखल झालेल्या गुन्ह्यावरून प्रतिबंध कारवाई करून अटक न करण्याकरिता नमूद आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे 1500/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान नमूद आलोसे यांनी तक्रारदार यांचे कडे 1,500 /-रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध शिरपूर शहर पोस्टे जि. धुळे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
- आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी -पोलीस अधीक्षक, धुळे.
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे
- सापळा पर्यवेक्षण अधिकारी – अभिषेक पाटील, पोलीस उप अधिक्षक ला.प्र. वि.धुळे
- सापळा व तपास अधिकारी- रूपाली खांडवी, पोलीस निरीक्षक
- सापळा पथक- पो.हवा. राजन कदम, पो.नाईक संतोष पावरा, चालक पो. हवा. सुधीर मोरे.