इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आदिवासी जमातीत धनगर जातीची घुसखोरी करु नये, आदिवासी समाजाच्या धनगर समाजाला लागु केलेल्या सवलती बंद कराव्या, नांदगाव तालुक्यात पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी..आदी मागण्यांसाठी आज नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील आदिवासी संघटनांनी मोर्चा काढला.
नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हुतात्मा स्मारक येथे रास्ता – रोको आंदोलन केले. यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आदिवासी जातीत धनगर जमातीने घुसखोरी करू नये अन्यथा आदिवासींवर होणार अन्याय – अत्याचार टाळण्यासाठी यापेक्षाही तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा या आंदोलनप्रसंगी विविध आदिवासी संघटनांनी दिला. या आंदोलनात हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव एकवटले होते.