पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कार्तिकी एकादशीसाठी शहरात सात लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा होणार आहे. सोबतच, मंदिराला सातशे वर्षापूर्वीचे पुरातन रूप देण्याच्या मंदिर विकास आराखड्यातील कामाचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते फोडण्याची तयारी मंदिर प्रशासनाने केली आहे.
मराठा, धनगर समाज आणि आदिवासी कोळी समाजाच्या शिष्ठमंडळाकडूनदेखील फडणवीस यांची भेट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराला पुण्यातील विठ्ठलभक्त राम जांभुळकर यांच्याकडून पाच टन फुलांच्या सजावटीचे काम सुरू आहे.
सध्या दर्शन रांग गोपाळपूर येथील दहा पत्राशेडमध्ये असून, भाविकांना दर्शनाला बारा तासांचा अवधी लागत आहे. २७०० कोटी रुपायच्या कामांचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.