इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – पवार कुटुंबियांचे निकटवर्ती असलेले प्रफुल्ल पटेल यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शरद पवार गटाच्या नेत्यांनी थेट राज्यसभेचे सभापती जगदिप धनकड यांच्याकडे केली आहे. त्यामुळे पटेल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पवार गटाने ४ महिन्यांपूर्वी दहाव्या अनुसूचीनुसार पक्षविरोधी कृती केल्यामुळे कारवाई करण्यासाठी मागणी केली होती. पण, त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे पवार गटाच्या शिष्टमंडळाने सभापतीची भेट घेऊन पुन्हा ही मागणी केली आहे. या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण उपस्थित होत्या.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षचा हक्क कोणाकडे यासाठी अजूनही केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. त्यात पवार गटाने ही मागणी केल्यामुळे त्यावर आता सभापती काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे आहे.