नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रतिबंधक कारवाई तहसील कार्यालय नवापूर येथील साहेबांना सांगून बंद करून देण्यासाठी खासगी इसम ३ हजार रुपयाची घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्यासह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या इतर साथीदारांवर केलेली प्रतिबंधक कारवाई तहसील कार्यालय नवापूर येथील साहेबांना सांगून बंद करून देण्यासाठी, आरोपी खाजगी इसम याने तक्रारदाराकडून प्रथमतः प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे १३ जणांचे एकूण १३ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आरोपी खासगी इसम याने तडजोडीअंती १० हजार रुपयांची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी ७ हजार रुपये आरोपी खाजगी इसम याने तक्रारदाराकडून आधीच स्वीकारले असल्याने, आज रोजी केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी खाजगी इसम याने तक्रारदार व त्यांचे इतर साथीदार अशा एकूण १३ जणांविरुद्धची प्रतिबंधक कारवाई तहसील कार्यालय नवापूर येथील साहेबांना सांगून बंद करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष ३ हजार रुपये एवढी रक्कम स्वीकारली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
यशस्वी सापळा कार्यवाही
- युनिट:- नंदुरबार
- तक्रारदार:- पुरुष, वय- ३५ वर्षे, रा. भादवड, ता. जि. नंदुरबार.
- आरोपी खाजगी ईसम:- हनु उर्फ अनक रामा वळवी, वय ३२ , रा. सोनारे दिगर , तालुका नवापुर , जिल्हा नंदुरबार.
- लाच मागणी रक्कम:- १३,००० /- रू.
- तडजोडीअंती एकूण मागणी :- १०,०००/- रू. यापैकी ७,०००/- रुपये आधीच स्वीकारले होते.
- लाचेची मागणी पडताळणी :- दि. ०९/११/२०२३
- लाच स्वीकारली :- दि. २१/११/२०२३ रोजी ३,०००/- रू.
- लाच मागणी कारण:- तक्रारदार यांच्यासह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल आहे. नमूद गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या इतर साथीदारांवर केलेली प्रतिबंधक कारवाई तहसील कार्यालय नवापूर येथील साहेबांना सांगून बंद करून देण्यासाठी , आरोपी खाजगी इसम याने तक्रारदाराकडून प्रथमतः प्रत्येकी १,०००/- रुपये प्रमाणे १३ जणांचे एकूण १३,०००/- रुपयांची मागणी केली. याबाबत पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आरोपी खासगी इसम याने तडजोडीअंती १०,०००/- रुपयांची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी ७,०००/- रुपये आरोपी खाजगी इसम याने तक्रारदाराकडून आधीच स्वीकारले असल्याने , आज रोजी केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी खाजगी इसम याने तक्रारदार व त्यांचे इतर साथीदार अशा एकूण १३ जणांविरुद्धची प्रतिबंधक कारवाई तहसील कार्यालय नवापूर येथील साहेबांना सांगून बंद करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष ३,०००/- रुपये एवढी रक्कम स्वीकारली, म्हणून गुन्हा.
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आलेली आहे.
- सापळा अधिकारी :- राकेश आ. चौधरी
पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार मो. नं. ९८२३३१९२२०
-सापळा कार्यवाही पथक :-पोहवा/विलास पाटील, अमोल मराठे, देवराम गावित,पोना संदीप नावाडेकर