नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आता नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांची नियुक्ती गृहविभागाने केली आहे.
संदीप कर्णिक यापूर्वी पुण्याचे पोलीस सहआयुक्त होते. ते आता नाशिकचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्त होणार आहे. अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ताच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसात राज्यात अनेक पोलिस अधिका-यांच्या बदल्या झाल्या. आता नाशिकचे पोलिस आयुक्त यांची बदली झाली आहे.