इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस नेते राहुल गांधी हे गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संवाद साधतांना दिसत आहे. काही दिवसापूर्वी ते दिल्लीतील कीर्तीनगर येथे असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटमध्ये गेले. येथे ते सुतार बांधवांना भेटले. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी एक लाकडाचा स्टडी टेबल सुतारांच्या मदतीने बनवला. आता स्टडी टेबल दिल्लीतील प्रमिलाबाई चव्हाण मूक बधिर शाळेला भेट म्हणून देण्यात आला आहे.
सुतारांना भेटण्यापूर्वी राहुल गांधी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर पोहोचून हमालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हमालांचा लाल गणवेश परिधान केला होता. इतक्यावरच ते थांबले नाही तर हातात त्यांनी ७५६ नंबरचा बिल्ला देखील लावला सामान सु्ध्दा उचलले होते. त्यामुळे त्यांची ही हमालाची भेट चांगलीच चर्चेची ठरली होती.
आता सुताराची ही भेट पुन्हा चर्चेत आली ती स्टडी टेबलमुळे. या टेबलचा फोटो शेअर करतांना राहुल गांधी यांनी नफरत के बाजार में मोहब्बत का दुकान असे म्हटले आहे.