नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सारडा सर्कल परिसरात चालत्या मारुती व्हॅनने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र मारुती कार पूर्णपणे जळून खाक झाली.
या घटनेनंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर ही आग आटोक्यात आली. वाहनांना आग लागल्याचे प्रकार काही महिन्यापूर्वी रोजच घडत होते. ते काही काळ बंद झाल्यानंतर पुन्ही ही घटना घडली.
चालत्या वाहनाला ही आग कशी लागली याचा तपास आता घेतला जात आहे. नाशिकला सारडा सर्कल परिसरात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यावेळेस सर्कलवर टर्न घेत असतांना ही आग लागली.