गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उत्तरकाशीमधील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांचा पहिला व्हिडिओ आला समोर (बघा व्हिडिओ)

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 21, 2023 | 11:22 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 92

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली- उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत एंडोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेरा पोहचला आहे. त्यामुळे सर्व कामगार सुरक्षित असल्याचे आनंदी वार्ता मिळाली आहे. याचा व्हिडिओ सुध्दा आता समोर आला आहे.

गेल्या दहा दिवसापासून या कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य जोरात सुरू आहे. प्रत्येक कामगारांचा जीव अमूल्य असून, सर्वांना वाचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्र सरकारने काल सांगितले होते. यासाठी सरकार आतमध्‍ये अडकलेल्या कामगारांबरोबर सतत संवाद साधत आहे. साधारण दोन किलोमीटर बांधलेल्या बोगद्याच्या मध्ये अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. बोगद्याचा हा २ किमीचा भाग पूर्ण झाला असून त्याचे सिमेंटीकरणही झाले आहे, त्यामुळे कामगारांना सुरक्षितता देणे शक्य झाले आहे.

बोगद्याच्या या भागात वीज आणि पाणी उपलब्ध आहे आणि कामगारांना अन्नपदार्थ त्याचबरोबर औषधे इत्यादींचा पुरवठा करण्‍यासाठी चार इंची ‘कंप्रेसर- पाइपलाइन’चा वापर केला जात आहे. आज, ‘एनएचआयडीसीएल’च्‍या वतीने अन्न,औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी आणखी ६ इंच व्यासाच्या वाहिनी जाईल इतके मोठे खोदकाम पूर्ण केले. यामुळे मदतकार्यामध्‍ये एक मोठे यश प्राप्त झाले आहे. आणखीही अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठा करण्‍यासाठी आरव्‍हीएनएलच्यावतीने दुसर्‍या एका उभ्या पाइपलाइनवर काम सुरू केले आहे.

बोगद्यामध्‍ये अडकलेल्या कामगारांच्या बचाव कार्यामध्‍ये विविध सरकारी संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यावर विशिष्ट कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्व संस्था कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्यात आता ४१ कामगारांपर्यंत एंडोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेरा पोहचला आहे. त्यामुळे सर्व कामगार सुरक्षित असल्याचे आनंदी वार्ता मिळाली आहे. बघा हा व्हिडिओ

?WATCH । #उत्तराखंड: उत्तरकाशी स्थित निर्माणाधीन #सिलक्यारा सुरंग में फंसे श्रमिकों तक पहुंचा एंडोस्कोपिक फ्लेक्सी कैमरा। सभी श्रमिक सुरक्षित बताए जा रहे हैं।

Report: Sanjeev Sundriyal pic.twitter.com/ygMBI8xG12

— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) November 21, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटेच मुंबईच्या रस्त्यावर…हे आहे कारण

Next Post

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून आतापर्यंत इतके कोटी झाले जप्त…सात पटीने झाली वाढ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
image0017CFH

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून आतापर्यंत इतके कोटी झाले जप्त...सात पटीने झाली वाढ

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा, जाणून घ्या, गुरुवार, ३१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 30, 2025
bjp11

शरद पवार गटाला धक्का….या माजी मंत्रीने त्यांच्या दोन पुत्रांसह केला भाजपामध्ये प्रवेश

जुलै 30, 2025
CM

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलै 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू….

जुलै 30, 2025
trump 1

भारतावर २५ टक्के ट्ररिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्पची घोषणा…

जुलै 30, 2025
IMG 20250730 WA0238 1

येवल्यातील विस्थापित गाळे धारकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक…

जुलै 30, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011