सोमवार, नोव्हेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

उत्तरकाशीमधील सिल्क्यारा येथे अडकलेल्या ४१ कामगारांच्या बचावासाठी असे सुरु आहे प्रयत्न

नोव्हेंबर 20, 2023 | 11:35 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20231120 113349 Dailyhunt


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली- उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य जोरात सुरू आहे. प्रत्येक कामगारांचा जीव अमूल्य असून, सर्वांना वाचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी सरकार आतमध्‍ये अडकलेल्या कामगारांबरोबर सतत संवाद साधत आहे.साधारण दोन किलोमीटर बांधलेल्या बोगद्याच्या मध्ये अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. बोगद्याचा हा २ किमीचा भाग पूर्ण झाला असून त्याचे सिमेंटीकरणही झाले आहे, त्यामुळे कामगारांना सुरक्षितता देणे शक्य झाले आहे.

बोगद्याच्या या भागात वीज आणि पाणी उपलब्ध आहे आणि कामगारांना अन्नपदार्थ त्याचबरोबर औषधे इत्यादींचा पुरवठा करण्‍यासाठी चार इंची ‘कंप्रेसर- पाइपलाइन’चा वापर केला जात आहे. आज, ‘एनएचआयडीसीएल’च्‍या वतीने अन्न,औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी आणखी ६ इंच व्यासाच्या वाहिनी जाईल इतके मोठे खोदकाम पूर्ण केले. यामुळे मदतकार्यामध्‍ये एक मोठे यश प्राप्त झाले आहे. आणखीही अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठा करण्‍यासाठी आरव्‍हीएनएलच्यावतीने दुसर्‍या एका उभ्या पाइपलाइनवर काम सुरू केले आहे.

बोगद्यामध्‍ये अडकलेल्या कामगारांच्या बचाव कार्यामध्‍ये विविध सरकारी संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यावर विशिष्ट कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्व संस्था कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. कामगारांसाठी सुरू असलेल्या बचावासाठी जे बोगद्याचे काम सुरू आहे, त्या कार्याविषयी ताजी माहिती खाली देण्‍यात आली आहे.

कामगारांच्या सुटकेसाठी केलेले कार्य :
ऑगर बोरिंग मशीनद्वारे कामगारांच्या सुटकेसाठी , ‘एनएचआयडीसीएल’च्‍या वतीने सिल्क्यारा टोकापासून अडव्या बोअरिंगचे काम आज संध्याकाळी पुन्हा सुरू होणार आहे.

असा आहे घटनाक्रम
-दि. 12.11.2023 रोजी, सिल्क्यारा ते बारकोटपर्यंत बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये सिल्क्याराच्या बाजूला 60 मीटरचा भाग कोसळला. या घटनेनंतर, राज्य आणि केंद्र सरकारने या अपघातामध्‍ये अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आणि आवश्‍यक ती सामुग्री जमा केली.

  • तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा सर्वोत्तम आणि जलद शक्य उपाय तोडगा काढण्‍यात आला. त्यानुसार कोसळलेल्या भागाच्या राडा –रोडा, चिखल, यातून 900 मिमी व्यासाची नळी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • तथापि, 17.11.2023 रोजी, जमिनीअंतर्गत होणा-या हालचालीमुळे संरचना सुरक्षित केल्याशिवाय हा पर्याय वापरणे असुरक्षित झाले. आतमध्‍ये अडकलेल्या माणसांचा विचार करून, त्या कामगारांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी सर्व शक्य आघाड्यांवर एकत्रितपणे वाटचाल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • यासाठी पाच पर्याय निश्चित करण्‍यात आले आणि या पर्यायांवर काम करण्‍यासाठी पाच वेगवेगळ्या एजन्सींवर जबाबदारी सोपवण्‍यात आली.
    यासाठी , ‘एनएचआयडीसीएल’ च्या वतीने अन्नासाठी आणखी 6 इंची पाइपलाइन तयार करत आहे. तसेच 60 मीटरपैकी 39 मीटर ड्रिलिंग पूर्ण झाले आहे. हा बोगदा तयार झाल्यावर त्यातून अधिक खाद्यपदार्थ पोहोचवणे सुलभ होईल.
  • बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच सीमा रस्ते संघटनेने अवघ्या एका दिवसात जोड मार्ग बांधण्याचे काम पूर्ण केल्यानंतर, आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ‘आरव्‍हीएनएल’ च्या वतीने दुसर्‍या एका पाइपलाइनवर काम करत आहे.
  • ‘एनएचआयडीसीएल’ काम करीत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेनंतर सिल्क्यारा च्या बाजूने ड्रिल करणे सुरू ठेवणार आहे.
  • सतलज जल विद्युत निगम लिमिटेड (एसजेव्‍हीएनएल) अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाठी उभ्या पद्धतीने ड्रिलिंगचे काम करीत आहे.
  • ओएनजीसीला खोल ड्रिलिंगमध्ये प्राविण्य आहे, त्यामुळे बारकोटच्या टोकापासून उभ्या ड्रिलिंगसाठी सुरुवातीचे कामही सुरू केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्री शिवमहापुराण कथेसाठी असे असेल प्रवेशव्दार….या आहे शिवभक्तांसाठी महत्त्वाच्या सूचना

Next Post

५४ व्या इफ्फीमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा या पुरस्काराने सन्मान

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
20 3 19WN8 e1700503926118

५४ व्या इफ्फीमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा या पुरस्काराने सन्मान

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011