इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीआयने केली आहे. २३ नोव्हेंबर २०२३ पासून विशाखापट्टणम येथे सुरू होणार्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी IDFC फर्स्ट बँक ५ सामन्यांच्या T20I मालिकेसाठी हे खेळाडू असणार आहे.
भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार असा असणार आहे. यात बहुतांश खेळाडू नवीन आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर रायपूर आणि बेंगळुरू येथे झालेल्या शेवटच्या दोन T20 सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून संघात सामील होईल.
असा आहे ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
पहिला T20I – २३ नोव्हेंबर – विशाखापट्टणम
दुसरा T20I – २६ नोव्हेंबर – तिरुवनंतपुरम
तिसरा T20I – २८ नोव्हेंबर – गुवाहाटी
चौथी T20I – १ डिसेंबर – रायपूर
पाचवी T20I – ३ डिसेंबर – बेंगळुरू