नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री शिवमहापुराण महाकथा निमित्ताने पाथडी गांव व इंदिरानगर परिसरात अवजड वाहनांना वाहतूकीस प्रवेश बंद राहणार असल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. दोंदे मळा, पाथर्डी गांव, नाशिक येथे दिनांक २१/११/२०२३ ते दि. २५/११/२०२३ दरम्यान प्रख्यात कथाकार श्री. पंडीत प्रदिपजी मिश्रा यांचा श्री शिवमहापुराण महाकथेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या निमित्ताने खुप मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. सदर परिसरात वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणुन जनतेच्या सोयीसाठी पोलिस उप आयुक्त (वाहतूक) चंद्रकांत खांडवी,यांनी ही अधिसुचना काढली आहे. या अधिसूचनेत दिनांक २१/११/२०२३ ते दि. २५/११/२०२३ दरम्यान दररोज सकाळी ०९.०० ते रात्री २१.०० वा पावेतो अवजड वाहनांना वाहतूकीस प्रवेश बंद करणे आवश्यक आहे.
अवजड वाहनांसाठी ‘प्रवेश बंद’ करण्यात आलेले मार्ग :-
१) पाथर्डी फाटा ते पाथर्डी गांव सर्कल, वडनेर गेट, विहीतगांव या मार्गावरील अवजड वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद ठेवण्यात येत आहे.
२) फेम सिग्नल ते कलानगर, पाथर्डी गांव सर्कल, पाथर्डी फाटा, या मार्गावरील अवजड वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद ठेवण्यात येत आहे.
वर नमुद मार्गावर दिनांक २१/११/२०२३ ते दि. २५/११/२०२३ दरम्यान दररोज सकाळी ०९.०० ते रात्री २१.०० या पावेतो अवजड वाहनाना वाहतुकीसाठी ‘प्रवेश बंद राहील. सदरवेळी सदर मार्गाने जाऊ इच्छिणारे अवजड वाहने हे खालील इतर पर्यायी मार्गाचा वापर करतील.
- अवजड वाहनांसाठी ‘पर्यायी मार्ग’:-
१) लोकमत रॅम्प वरुन ओव्हर ब्रीज मार्गे द्वारका या मार्गाचा अवजड वाहनांनी वापर करावा.
२) फेम सिग्नल ते द्वारका ओव्हर ब्रीज वरून गरवारे या मार्गाचा अवजड वाहनानी वापर करावा.
या सेवेसाठी निर्बंध नाही
वरील निबंध हे दिनांक २१/११/२०२३ ते दि. २५/११/२०२३ दरम्यान दररोज सकाळी ०९.०० ते रात्री २१.०० वा पावेतो अंमलात राहतील. तसेच सदर कार्यक्रमा दरम्यान परिस्थीतीप्रमाणे वाहतुक वळविणे संदर्भात मार्गात बदल करण्याचे अधिकार राखुन ठेवण्यात आले आहे. वरील मार्गात व वेळेत परिस्थीतीनुसार ऐनवेळी कोणतीही पूर्वसुचना न देता बदल करण्याचे अधिकार राखुन ठेवण्यात आलेले आहेत. वरील सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेकरीता असलेली वाहने, अग्निशमन दलाची वाहने, शववाहिका रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना लागू राहणार नाहीत.