इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तामिळनाडूमध्ये. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस १०० फूट दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या भीषण बस अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघात ५९ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा बोलले जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मृत पावलेल्यामध्ये ३ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे.
कुन्नूरमधून तेनकासीच्या दिशेने जाताना बसचा हा भीषण अपघात झाला. मारापलमजवळ दरीत ही बस कोसळली. या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ८ लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळ बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झालं असून मी शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. तर जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, अशी पोस्ट X वर करण्यात आली आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.