इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने विश्वचषकात सलग विजय मिळवल्यामुळे सर्वांच्या आशा उंचावल्या होत्या. पण, अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांची निराशा झाली. तर संघाच्या कप्तानालाही आपले अश्रू रोखता आले नाही. रोहित शर्माने आपले अश्रू मैदानात रोखले पण, तो धावत धावत ड्रेसिंग रुममध्ये जात असतांना त्याचे हे अश्रू मात्र लपून राहिले नाही.
खरं तर रोहित शर्मा याचा हा शेवटचा वनडे वर्ल्डकप होता. त्यामुळे त्याच्या भावना या वर्ल्डकपशी निगडीत होत्या. २०१९ वर्ल्डकपमध्येही उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. यावेळेस मात्र चांगली संधी होती. पण, ती मिळाली नाही. त्यामुळे रोहित शर्मा अश्रू बरंच काही सांगून गेले. पण, भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना मात्र हा पराभव जिव्हारी लागला असला तरी भारतीय संघाची विश्वचषकात असलेली कामगिरीमुळे ते खुशही होते. या विश्वचषकात विराट कोहली ७६५ धावा करून या स्पर्धेत आघाडीवर राहिला. त्यानंतर रोहित शर्माने ५९७ धावा केल्या. पण पूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली शेवट मात्र हवा तसा राहिला नाही तरी भारतीय क्रिकेट संघाने केलेल्या कामगिरीचे मात्र कौतुकच झाले…
नाणेफेकीचा कौल व पराभव
खरं तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी भीती होतीच. ती या सामन्यात खरी ठरली. या सामन्यात भारताला २४० धावांवर रोखण्यात ऑस्ट्रेलियाने रोखले व हे आव्हान ४३ षटकात ४ गडी गमवून पूर्ण केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप जेतेपदावर मिळवले. ऑस्ट्रेलियाने खरं तर या विश्वचषकामध्ये दोन सामने गमावले होते. पण, अंतिम सामन्यात त्यांनी सर्व सामने जिंकणा-या भारतीय संघाला पराभूत केले.