इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑक्टोंबरच्या सुरुवातीलाच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात २०९ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे १ हजार ५५२ रुपयाला मिळणार हा सिलेंडर आता १ हजार ७३१ रुपयाला मिळणार आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. या सिलेंडरची किंमत ९०६ रुपये राहणार आहे.
नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही एलपीजी सिलेंडरची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारित केली जाते. ती आज झाली आहे. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये देशभरातील सर्व कनेक्शनधारकांसाठी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी केली होती.
त्यानंतर व्यावसायिका सिलेंडरच्या किंमती १०० रुपयाच्या आसपास कमी झाल्या होता. पण, आता एका महिन्यानंतर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २०९ वाढ करुन ऑक्टोंबर हीट दिली आहे.ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी रविवारी कमर्शिअल एलपीजी सिलेंडरची किंमतीत वाढ केली असून या किंमती आजपासून लागू होणार आहे.