इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारत आणि नेदरलँडमधील सामन्यात भारताने प्रथम फंलदाजी करताना ४ विकेट गमावत ४१० धाव करुन ४११ धावांचे आव्हान दिले होते. पण, नेदरलॅण्ड संघ २५० धावांवर ऑल आऊट झाला. त्यामुळे भारताने हा सामना तब्बल १६० धावांच्या फरकाने जिंकला. विश्वचषकात सलग नऊ सामने जिंकण्याचा इतिहासही भारताने केला. आता भारताची सेमी फायनल मुंबईत वानखेडे स्टेडियमव १५ नोव्हेंबरला होणार आहे.
आजच्या सामन्यात जयप्रती बुमराह, मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा कुलदीप यादव या चौकडीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर रोहित शर्मा व विराट कोहनी या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. फलंदाची करतांना टीम इंडियाच्या केल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी केलेली शतकी खेळी व रोहितच्या वेगवेगान ६१ धावांच्या जोरावर ४२२ चा टप्पा पार केला. वर्ल्ड कपमधील प्रथम फलंदाजी करतानाची दुसरी मोठी सर्वोच्च धावसंख्या आज ठरली. या सामन्यात रोहित शर्मा यांनी ६१ ,शुभम गिल ३२ विराट कोहली ५६ तर श्रेयस अय्यर ९४ तर लोकेश राहुलने १०२ धाव केल्या. सुर्यकुमार यादवला दोनच धावा करता आल्या.
हिटमॅन रोहित शर्माचा दिवाळीच्या दिवशी षटकारांचा विक्रम
विश्वचषक २०२३ मध्ये आज बंगळुरूच्या एम.ए. चिनन्नास्वामी स्टेडियमवर आज एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितने स्वतःच्या नावावर केला. त्याने आज दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला. एबीच्या नावावर ५८ षटकार होते, आता रोहितच्या नावावर ६० षटकार झाले आहेत. पहिल्या डावाच्या ७ व्या षटकात कोलिन एकरमॅनच्या एका चेंडूवर रोहितने ९२ मीटर लांब सिक्स मारला आणि वन-डे क्रिकेटमधील हा एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. रोहित ६१ धावांवर बाद झाला आहे. याआधी एबी डिव्हिलियर्स- ५८ षटकार, (२०१५), ख्रिस गेल- ५६ षटकार, (२०१९) आणि शहिद आफ्रिदी- ४८ षटकार (२००२) असे एका कैलेंडर वर्षातील सर्वाधिक षटकारांचे विक्रम होते.
याखेरीज विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार खेचणारा कर्णधार म्हणून देखील रोहितला आज मान्यता मिळाली. त्याने इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नावे असलेला २३ षटकारांचा विक्रम आज मोडला. आता विश्वचषकातील सर्वाधिक षटकारांचा विक्रम देखील रोहितच्या रडारवर आहे.